महाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाने लावला सुरुंग..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १७ जूलै २०२४ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह तब्बल २९ लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. यावेळी शहराध्यक्ष तुषार कामठे, रविकांत वर्पे, सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार प्रशांत सपकाळ, देवेंद्र तायडे, मा नगरसेविका सुलक्षणा शीलवंत, विशाल जाधव शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी विभाग उपस्थित होते.

प्रवेश केलेल्या मान्यवरांची नावे पुढीलप्रमाणे :
१) माजी महापौर हणूमंतरावजी भोसले २) माजी महापौर वैशालीताई घोडेकर ३) शहर जिल्हा कार्याध्यक्ष मा विरोधी पक्षनेते राहुल भोसले ४) माजी नगरसेवक पंकज भालेकर ५) माजी नगरसेवक प्रवीण भालेकर ६) माजी नगरसेविका संगीता ताम्हाणे ७) दिवंगत नगरसेविका पौर्णिमा सोनवणे ८) कार्यकर्ते रवी सोनवणे ९) दिवंगत नगरसेवक दत्ता काका साने यांचे पुत्र यश साने १०) माजी नगरसेवक संजय नेवाळे ११) माजी नगरसेवक वसंत बोराटे १२) माजी नगरसेवक विजया तापकीर १३) माजी नगरसेवक समीर मासुळकर
१४) माजी नगरसेवक गीता मंचरकर १५) माजी नगरसेवक संजय वाबळे १६) माजी नगरसेविका वैशालीताई उबाळे १७) माजी नगरसेविका शुभांगीताई बोराडे १८) माजी नगरसेविका विनया ताई तापकीर १९) माजी नगरसेविका अनुराधा गोफने २०) माजी नगरसेवक घनश्याम खेडेकर २१) युवक राष्ट्रवादी भोसरी विधानसभा अध्यक्ष सागर बोराटे २२) शिक्षण मंडळाचे माजी सभापती निवृत्ती मामा शिंदे २३) माजी नगरसेवक तानाजी खाडे २४) माजी नगरसेवक शशिकीरण गवळी २५) विशाल आहेर २६) युवराज पवार कामगार आघाडी २७) विशाल आहेर सरचिटणीस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा २८) नंदूतात्या शिंदे २९) शरद भालेकर
पिंपरी चिंचवड शहर हे अजित पवारांचा बालेकिल्ला असलेचे समजते आणि याच बालेकिल्ल्यात शरदपवार गटाने सूरुंग लावून तब्बल २९ शिलेदार आपल्याकडे घेतल्याचे समजते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!