महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना राज्यस्तरीय अधिवेशन २०२५

प्रतिनिधी सतिश वि.पाटील मुलुंड मूंबई दि. १२ फेब्रुवारी २०२५ शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीतीमध्ये ईशान्य मुंबईचे खासदार संजयजी पाटील साहेब यांचे योगदानातून तसेच विभागप्रमुख रमेशभाई कोरगावकर साहेब, सौ रेडकर ताई यांच्या उत्कृष्ठ संघटन कौशल्यामुळे मुलुंड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षकांच्या या शिक्षण क्षेत्रातील सुधारणांवर या अधिवेशनात मोलाचे विचारमंथन झाले.
या अधिवेशनास शिवसेना नेते व सचिव विनायक राऊत साहेब, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष आमदार अभ्यंकर साहेब, शिवसेना पदाधिकारी, महाराष्ट्रातील शिक्षक सेना पदाधिकारी व सदस्य तसेच मोठ्या संख्येने उपस्थित शिवसैनिक यांनी आपली उपस्थिती दर्शवली त्या बद्दल सर्व मुलुंड मधील पालकसंघटनेतील सर्व पदाधिकारी तसेच खास करून शिक्षक सेनेचे पदाधिकारी वेंकटेश अय्यर सर्व मुलुंडमधील शिवसेनेचे पदाधिकारी व मुलुंडकर मोठ्या संख्येत उपस्थित होते.