पिंपरी चिंचवड मनपा.पिंपरी-चिंचवडभेटीगाठीमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

उपमुख्यमंत्री मा.अजित पवार यांनी त्यागमुर्ती माता रमाई यांच्या स्मारकाच्या जागेचा विषय घेतला गांभीर्याने..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २४ सप्टेंबर २०२५ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यागमुर्ती माता रमाई स्मारक समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित दादा पवार यांची २१ तारखेला भेट घेऊन.
त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मारकाच्या जागे वरील इतर आरक्षण काढून व लवकर काम पूर्ण करून मार्गी लावावे या साठी निवेदन दिले होते. लगेच दादानी या विषयाचे गाभिर्य लक्षात घेऊन त्यांचे स्वीय सहाय्यक विकास पाटिल यांना सुचना दिल्या व समिती सदस्य यांची बैठक आयुक्त शेखर सिंह यांच्या बरोबर लावण्यास सांगितले. व आज दि. २४/०९/२०२५ रोजी मा. विकास पाटिल यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांच्या सोबत समितीची बैठक घेण्यात आली.
त्यामध्ये २५ गुंठे जागा पूर्ण माता रमाई उद्यानासाठीच आहे त्यात आपण स्मारक करणार आहोत.
स्मारक समितीच्या वतिने पूर्वी ज्या सुचना केल्या तशाच पध्दतीने स्मारक करू, मात्र त्या जागेवर दूसरे कोणतेही बांधकाम होणार नाही, पाच मजली बिल्डिंग उभारणार नाही, इतर पर्पजच्या नावा खाली असे कोणतेही काम केले जाणार नाही असे आयुक्तांनी सांगितले. लवकर ठाणे महापालिकेने केलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकास भेट देण्यात येईल नविन काही करता येईल का? या विषयी समितीच्या सदस्यांन सोबत बैठक घेऊन आद: भिमराव आंबेडकरसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य स्मारक लवकरच उभे करणार आहोत असे अजित दादा यांच्या सुचनेनुसार त्यांचे स्वीय सहाय्यक विकास पाटील यांच्या उपस्थितीत आयुक्तांनी
समितीला आस्वासन दिले आहे.
परंतु समितीच्या वतीने विकास पाटील यांच्या समोर समाजाची दिशाभूल करून स्मारका व्यतीरीक्त इतर पर्पज साठी जागेचा वापर केल्यास अजितदादा व प्रशासनाच्या विरोधात समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही यावेळी देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!