विशेषशहर

शहरातील विकास कामांमध्ये समानता व सुसुत्रता राखण्याच्या दृष्टीने मनपातील सर्व विभागाकडील अभियंत्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन..

प्रतिनिधी-पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकासासह तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांची उभारणी चालु असल्याने त्यास पुरक असे पायाभुत सोयी सुविधांची कामे चालु आहेत, त्यामध्ये रस्ते, पदपथ, उद्याने, सुविधा इमारती इ. कामे चालु व नियोजित आहे. भारत सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाच्या निर्देशानुसार व आयोजित विविध उपक्रमांतर्गत शहरात अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार कामे चालु असुन तसेच नव्याने देखील कामे करणेचे नियोजित आहे. शहरातील विकास कामांमध्ये समानता व सुसुत्रता राखण्याच्या दृष्टीने मनपातील स्थापत्य, पाणीपुरवठा, जलनिसाःरण व विद्युत विभागाकडील अभियंत्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन ऑटोक्लस्टर, चिंचवड येथील सभागृहात करण्यात आले होते. सदर कार्यशाळेचे उद्घाटन श्री. शेखर सिंह मा. आयुक्त, तसेच डॉ. संजय शिंदे – सह पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड शहर यांच्या शुभहस्ते करण्यात आले आहे. सदर कार्यशाळेच्या प्रारंभी श्री. प्रमोद ओंभासे यांनी कार्यशाळा आयोजित करण्याचे प्रयोजन विशद करत माहिती दिली. सदर
कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मा. आयुक्त सो यांनी कार्यशाळेचा उद्देश कथित करत, मनपाच्या स्थापत्य प्रकल्प विभागाने केलेल्या कामांचे उदाहरण देत माहिती दिली व इतर विभागांनी त्याप्रमाणे विकास कामे करत मनपास देशातील इतर शहरांमध्ये अग्रेसर ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर मा. सह पोलिस आयुक्त यांनी शहरात काम करत असताना आलेल्या अनुभवांची तसेच न्यायालयातील प्रकरणांमधील आदेशांचे उदाहरण देत कायदेशीर तरतुदी विशद केल्या.
सदर तरतुदींचा वापर करत रस्त्यांची व पादचाऱ्यांसाठी सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक माहिती दिली. तद् नंतर सदर नियोजनासाठी शहरातील वाहतुक नियोजन सल्लागार श्री. प्रसन्न देसाई, आर्किटेक्ट, श्रीमती प्रांजली देशपांडे, अर्बन प्लॅनर, श्री. प्रताप भोसले, ट्रान्सपोर्ट प्लॅनर, श्रीमती संस्कृती मेनन, सेंटर फॉर एन्वायरमेंट एज्युकेशन यांनी शहरातील रस्ते, पादचारी, सायकलस्वार स्नेही करण्याकरीता तसेच सुरक्षित करण्यासाठी करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबत सादरीकरण केले तसेच मनपाच्या अधिकारी / अभियंता व वाहतुक पोलिस अधिकारी यांनी उपस्थित केलेल्या शंकाबाबत चर्चा करुन निरासन केले आहे. सदर
कार्यशाळेचे समारोप श्री. बापुसाहेब गायकवाड, कार्यकारी अभियंता, वाहतुक नियोजन विभाग यांनी आभार प्रदर्शन करुन केले. सदर कार्यशाळेसाठी श्री. सुनिल पवार, उप अभियंता व श्री. संतोष कुदळे, कनिष्ठ अभियंता यांनी नियोजन केले होते. सदर कार्यशाळेस श्री. ज्ञानदेव जुंधारे, सह शहर अभियंता, श्री. मनोज सेठिया, सह शहर अभियंता, श्री. रामदास तांबे, सह
शहर अभियंता तसेच मनपामधील कार्यकारी अभियंता, उप अभियंता व सल्लागार यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button