
प्रतिनिधी यलघोल मावळ इतिहासाला नवीन पालवी फुटणे गरजेचे आहे तेव्हाच समाजात परिवर्तन करणे शक्य होईल. दिनांक 10.06.2023 रोजी येलघोल ता. मावळ जिला – पुणे या ठिकाणी प्रथमच येथील लेणी संवर्धनाचे कार्य हाती घेण्यात आले होते. हे कार्य पार पाडण्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक, श्रम, सामग्री इत्यादींची गरज भासणार होती ही गोष्ट लक्षात ठेवून या कार्याची सुरुवात झाली. जास्त प्रचार – प्रसार न करता हे कार्य कशा प्रकारे येथील स्थानिकांना घेऊन करता येईल या वर जास्त भर देण्यात आला होता. कारण काही गोष्टींचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला तर त्यांच्या विपरीत काही गोष्टी होऊ शकतात म्हणून हे कार्य संयमाने करणे योग्य होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे कार्य खूप धाडसाचे असून यात ज्यांनी ज्यांनी हातभार लावलेला आहे ते खरच खूप श्रद्धावान असून चळवळीचे खरे वारसदार आहेत. कारण सध्याचे वास्तव पाहता सर्व ठिकाणी आपापले गट झाले आहेत पण इथे सर्व गोष्टी विसरून आलेला एक खरा योद्धा होता. ज्याने आपल्या पूर्वजांना खऱ्या अर्थाने तन-मन धनाने आदरांजली वाहिली आहे. येलघोल बुद्ध लेणी येथील तिसऱ्या टप्प्यातील कार्य दिनांक 25.06.23 रोजी थांबवण्यात आले आहे. पुनः पाऊस थांबल्यावर हे कार्य चालू राहणार आहे.
आज पर्यंत लेणी संवर्धन म्हणजे लेण्यांना भेटी देणे, कार्यशाळा, वंदना इतक्या पुरते मर्यादित होते पण दुर्लक्षित लेण्या आपल्या ताब्यात घेण्याचा हा पहिला प्रयोग होय. कारण जो पर्यंत या लेण्यावर आपले सांस्कृतिक उपक्रम होणार नाहीत तो पर्यंत ह्या लेण्यांचे संवर्धन होणार नाही. या कार्यास पुणे जिल्ह्यातील विविध उपासक,संघटना यांच्या माध्यमातून आर्थिक दान प्राप्त झाले होते तसेच काही उपसाकानी लागणारी सामग्री दान दिली होती. मनाला संयमाची ढाल बनवून येणाऱ्या संकटावर मात करत हे कार्य सर्वांच्या सानिध्यात पार पडत आहे. आत्तपर्यंतच्या पहिल्या टप्यात – साधारपणे 50 उपासाकांच्या उपस्थितीने आणि श्रम दानाने पार पडला. दुसरा टप्पा 40, तसेच तिसरा टप्पा 30 व अंतिम 20 उपासकांच्या अथक परिश्रमाने पार पडला. हे कार्य असेच चालू राहणार आहे कारण हे कार्य पूर्णत्वास घेऊन जाण्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. सध्या पावसात आपण सहजपणे लेणी परिसरात जाऊ शकतो. पण पाऊस थांबल्यावर ह्या लेणीचा संपूर्ण परिसर योग्य रित्या समतल होणार असून परिसरात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्न असणार आहे. जेणे करून ह्या परिसरात श्रामनेर शिबिर, प्रशिक्षण शिबिर तसेच वार्षिक महोत्सव घेता येईल.

या मोहिमेस हातभार लावलेल्या तमाम – उपासक/ उपासिकांचे, लेणी संवर्धकांच्या वतिने आभार व्यक्त करण्यात आले.



