
प्रतिनीधी सतिश वि.पाटील मुलुंड मूंबई दि.१९ मार्च २०२५ अनेक अडचणींवर मात करीत अंतराळवीर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर सुखरूप परतल्या. हा भारताच्या दृष्टीने अभिमानस्पद क्षण आहे.
सुनीता विल्यम्स अंतराळात होत्या, पण त्यांचे मन मात्र सतत पृथ्वीवर धडधडत होतं. एक तांत्रिक बिघाड… आणि परतीचा प्रवास अनिश्चिततेत अडकला. अवकाशाच्या अथांग शांततेत, नऊ महिने एकटेपणाच्या कठीण काळातून जात असताना, त्यांनी खचून जाण्याऐवजी स्वतःला सावरलं.
एकाकीपणा, अनिश्चितता, भीती… या सगळ्यांना त्यांनी संयमाच्या आणि जिद्दीच्या बळावर मात दिली. दररोज स्वतःला मजबूत ठेवलं, संशोधन सुरू ठेवलं आणि प्रतीक्षेचा प्रत्येक क्षण आशेने जगला. पृथ्वीवर त्यांच्या शौर्याच्या कथा ऐकल्या जात होत्या, लोक त्यांची परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होते.
आणि शेवटी तो क्षण आला…
पहाटेचा प्रकाश फिकट होत असताना, अवकाशयान पृथ्वीच्या दिशेने झेपावलं. हृदयाचे ठोके वेगवान झाले, डोळ्यांत अश्रू दाटले, आणि अखेर… ती सुखरूप पृथ्वीवर परतली!
हा विजय होता संयमाचा, धैर्याचा, आणि आत्मविश्वासाचा! त्यांनी जगाला शिकवलं – संकटं कितीही मोठी असू द्या, पण जिद्द असेल तर काहीही अशक्य नाही!
सुनीता विल्यम्सच्या धैर्याला, संयमाला आणि जिद्दीला सलाम!



