माईंड स्पेस हॉटेल्स अँड रिसॉर्टच्या मालकांनवर ॲट्रॉसिटी लावा-नितीन दूनघव

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ३० सप्टेंबर २०२३ माईंड स्पेस हॉटेल्स अँड रिसॉर्टच्या मालकांनवर ॲट्रॉसिटी गुन्हा नोंदण्याबाबत पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे यांना लेखी निवेदन देण्यात आले.
या वेळी आंदोलनकर्ते नितीन दूनघव यांनी सांगीतले की श्री. आशिष भंडारी व श्री. केतन ठक्कर यांचे पिंपरी चौकामध्ये माईंड स्पेस हॉटेल्स अँड रिसॉर्ट नावाचे एक ३ स्टार हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये मी १३ ते १४ वर्षे काम केले. कोरोना काळामध्ये या हॉटेलच्या मालकांनी पंधरा दिवसांनी हॉटेल चालू करतो म्हणून आज चार वर्षे पूर्ण होत आहेत अजूनही हॉटेल चालू केलेले नाही.
या काळात मला कोणते वेतन देण्यात आले नाही, तसेच कोरोना मध्ये यांनी कुठल्या ही प्रकारची मदत केला नाही शिवाय श्री. आशिष भंडारी व श्री. केतन ठक्कर यांनी माझ्यावर मानसिक खूप अत्याचार केला. यामुळे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा. कारण की मी एक दलित आहे म्हणून माझी पिळवनूक होती आहे का?
सर मी हॉटेल माईंड स्पेस रिसॉर्ट प्रायव्हेट लिमिटेड मध्ये गेली पंधरा वर्षे काम करत होतो कोरोना काळामध्ये मालक श्री. प्रशांत भंडारी व मालक श्री. केतन ठक्कर यांनी १५ ते २० दिवसाच्या कालावधी सांगून हॉटेल बंद केले आज चार वर्षे पूर्ण होऊन गेले तरी हॉटेल चालू केले नाही चार वर्ष आम्ही त्यांच्या भूल थापांना बळी पडत गेलो.
मालकाने हॉटेल बंद केले दिनांक १९ मार्च २०२० त्यानंतर आम्ही वारंवार मालकाला फोन केले हॉटेल कधी चालू होणार त्यावेळेस मालकांनी सांगितलं पंधरा विस दिवसात चालू करतो किंवा एक महिन्याने चालू करतो असे बोलत बोलत त्यांनी तीन वर्ष लावली त्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्या घराची परिस्थिती खूप भयानक झाली आहे. माझ्या आईचे स्पाईनचे ऑपरेशन झाले आहे, त्याला ७५ हजार रुपये खर्च झाला. माझ्या लहान भावाला ब्लड कॅन्सर झाला. त्याला डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे पाच लाख ऑपरेशनचा खर्च आहे. माझ्या भावाचे ऑपरेशन कसं करू माझ्याकडे एकही रुपया नाही. शिवाय मी श्री. प्रशांत भंडारी व श्री. केतन ठक्कर यांच्याकडे फोन केला असता ते उडवा उडवीचे उत्तर देतात म्हणतात की मी दिल्लीला आहे. मी तुम्हाला दोन-तीन दिवसांनी पेमेंट करतो आज चार महिने होऊन गेले ते मला कोणताही प्रतिसाद देत नाही किंवा मी फोन केला असता असे लक्षात आले की त्यांनी माझा नंबर ब्लॅक लिस्टला टाकलेला आहे. कारण कसला ही प्रतिसाद मिळत नाही. सर दिनांक ०१ एप्रिल २०२३ रोजी मी व माझे सहकारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये अमरण उपोषण केले होते. त्यावेळेस वरिष्ठ पी.आय. श्री. शंकर अवताडे हे पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशन मध्ये कार्य करत होते. दि. ०९ एप्रिल २०२३ रोजी श्री. प्रशांत भंडारी हे मालक पिंपरी पोलीस स्टेशन मध्ये वरिष्ठ पी.आय. श्री. शंकर अवताडे यांच्यासमोर त्यांनी आश्वासन दिले की मी नितीन व इतर कामगारांना तीन वर्ष सहा महिन्याचा पगार, लिविंग कॅशमेंट त्यांचा बी. आर. एस. त्यांची ग्रॅज्युएटी व पूर्ण पी.एफ. भरून देतो शिवाय काही राहिले असेल तर त्याची हामी द्यायला तयार आहे. पण अमरण उपोषण मागे घ्या असे त्यांनी पिंपरी पोलीस स्टेशन मध्ये सांगितले व आम्ही श्री. प्रशांत भंडारी यांच्या सांगण्यावरून वरिष्ठ पोलीस अधिकारी श्री. शंकर अवताडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये येऊन आमचे उपोषण मागे घेण्यास लावले. त्यांनी सांगितले तीन दिवसाच्या आत तूमच्या सर्व मागण्या श्री. प्रशांत भंडारी पूर्ण करणार आहेत त्यामुळे आता तू उपोषण सोड यावेळी त्यांच्या बरोबर भाजपाचे कार्यकर्ते श्री. अमोल थोरात हे सुद्धा आले होते. त्यामुळे मी माझे उपोषण मागे घेतले परंतु आज चार महिने होऊन गेले तरीही त्यांनी मला व इतर कामगारांना ठरल्या प्रमाणे काहीही दिले नाही. या मूळे आज आम्हा सर्वांना भीक मागायची वेळ आलेली आहे. शिवाय माझा लहान भाऊ मरणाच्या दारात उभा आहे माझी आई ही सुद्धा त्याच परिस्थितीमध्ये आहे.
कारण की त्यांच्यामुळे मी आणि माझं घरदार रस्त्यावर आल्याने भिक मागायची वेळ आली आहे.
यात पूढे ते आयूक्तांना उद्देशून बोलले की सर तुम्हीच मला सांगा हे कितपत योग्य आहे कारण की नऊ दिवस आम्ही आमरण उपोषण केले ते उपोषण त्यांनी खोटे बोलून संगनमताने तोडले त्याच्यामुळे आमच्या मनाला खूप सार्या वेदना झाल्या. सर मी एक दलित कूटूंबातील आहे. माझ्यासारखे बरेच दलित मुलं त्या हॉटेलमध्ये काम करत होते त्यांची ही परिस्थिती माझ्यासारखीच आहे पण माझी खूपच हालाकीची झाली आहे. तुम्हीच मला न्याय द्या. अन दोन्ही मालकांवरती ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा.
शिवाय आज ३४ दिवस झाले मी व माझे सहकारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये धरणे आंदोलन करत आहोत आम्हाला न्याय मिळत नाही तुम्हीच आम्हाला न्याय द्यावा. कारण की श्री. प्रशांत भंडारी व श्री. केतन ठक्कर यांनी मांझा शारीरिक मानसिक पिळवनूक केली आहे. भिक मागण्या सारखी वाईट वेळ आणलेली आहे.
आता तर असं वाटतं कुठेतरी थांबावं कधी कधी असं वाटतं, श्री. केतन ठक्कर श्री. आशिष भंडारी यांनी मला मानसिक यातना देवून आत्महत्या करण्यास भाग पाडत आहे. जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये माझ्या न्यायासाठी इथेच उभे राहणार आहे. कृपया करून मी तुम्हाला विनंती करतो की मला न्याय द्या मी खूप हतबल झालेलो आहे परंतु सर तुमच्यासारखे या जगामध्ये खूप कमी लोक असतील जे आमच्यासारख्या दलित बांधवांना न्याय मिळवून देणारे आहे. सर माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर लक्ष घालून मला न्याय मिळवून द्यावा आज मला साधारण ३५ दिवस उलटून गेले परंतु कोणीही माझ्याकडे लक्ष देत नाही किंवा मला न्याय देत नाही मी तुम्हाला प्रार्थना करतो की तुम्ही तरी यात लक्ष घालून श्री. प्रशांत भंडारी व श्री. केतन ठक्कर यांच्या वरती ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा व आमची मानसिक पिळवनूक थांबवावी.
प्रशांत भंडारी व केतन ठक्कर यांनी माझे अमरण उपोषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे खोटे आश्वासन देऊन तोडले त्यामुळे मला खूपसाऱ्या गोष्टींना सामोरे जावे लागले सर प्रशांत भंडारी आणि केतन ठक्कर हे खूप मोठे बिझनेस मॅन आहे. ते आमच्या सारख्या गोरगरिबांना आपल्या पायाचे जोडे समजतात म्हणूनच त्यांनी आमरण उपोषण तोडून देखील मला न्याय दिलेला नाही कृपया करून तुम्ही मला न्याय द्यावा ही नम्र विनंती असे ते शेवटी बोलले




