
प्रतिनिधी मूंबई केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी प्रसिद्ध केलेल्या पीजीआय २.० अहवालाच्या निष्कर्षाबाबत आदरणीय पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सेंटर येथे, चव्हाण सेंटरच्या शिक्षण विभागाच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या आणि शिक्षकांना भेडसावणाऱ्या अडचणी समजून घेण्यात आल्या. शिक्षकभरती, पवित्र पोर्टल, अशैक्षणिक कामे, आदी गोष्टींवर चर्चा करण्यात आली.
याबाबत आदरणीय पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे अर्थ आणि शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे ठरले.
यावेळी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, ‘प्रथम’च्या फरिदा लांबे, गिरीश सामंत, विकास गरड, ऐनुल अत्तार, काकासाहेब वाळूंजकर, मुख्याध्यापक महासंघाचे जे के पाटील, महेंद्र गणपुले, डॉ. माधव सूर्यवंशी, मच्छिंद्र बोऱ्हाडे, अजित तिजोरे, तुषार म्हात्रे, रसिका मुळ्ये आदी मान्यवर उपस्थित होते. राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉ. वसंत काळपांडे, शिक्षण तज्ज्ञ डॉ. ह. ना. जगताप, किशोर दरक आदी बैठकीत ऑनलाईन सहभागी झाले होते. तसेच प्रथम, मुक्तांगण, कोटक, टीच फॉर इंडिया, हमारा फाऊंडेशन, रंगुनवाला, निपुण भारत, विकास सहभाग प्रतिष्ठान आदी संस्थांच्या प्रतिनिधींनी देखील या बैठकीत सहभाग घेतला.असे सूप्रिया सूळे यांनी ट्विटरवर ट्विट करून सांगीतले.



