मुख्यमंत्री साहेब, “५०० चौरस फुटांचे घर देऊ” या तुम्हीच दिलेल्या शब्दाला जागणार का ? -प्रा. बी. बी. शिंदे

“५०० चौरस फुटांचे घर देऊ असे आपण बोलले होता या करिता आपणास पुन्हा एकदा आठवणी करिता स्मरण पत्र..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि.२९ मार्च २०२५ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आपण उप मुख्यमंत्री असताना शिवाजी पार्क मुंबई येथील महायुतीच्या प्रचार सभेत दि. १४ नोहेंबर २०२४ रोजी झोपडपट्टी धारकांना, आम्ही पुन्हा सत्तेवर आल्यास ५०० चौ. फुटांचे घर देऊ, असे आश्वासन व घोषणा केली होती. त्यावेळी आपण उप मुख्यमंत्री होतात. आत्ता आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहात.
याची आपणास आठवण करून देण्याकरिता, सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, या सामाजिक संघटनेचे संस्थापक/ अध्यक्ष भिमरत्न प्रा. बी. बी. शिंदे व त्यांचे सहकारी वर्ग यांनी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच दोन्ही उप मुख्यमंत्री साहेब, आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई ३२ यांना या विषयावर दिनांक २० जानेवारी २०२५ रोजी एक लेखी निवेदन देऊन, आपण दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी, आणि तसा शासन मान्य जी. आर. (परिपत्रक) काढण्यात यावा, या बाबत मागणी केली होती.
या विषयंकित प्रश्नाबाबत महोदय, आपणास विसर पडला की, काय ? म्हणून पुन्हा एक स्मरणपत्र निवेदन आम्ही आपणास व आपल्या दोन्ही सहकारी उपमुख्यमंत्र्यास, तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे साहेब, यांना दिनांक २० मार्च २०२५ रोजी देऊन आम्ही आपणास आपणच दिलेल्या शब्दास जागा, असे या बाबतचे स्मरण पत्र दिले.
या स्मरण पत्रासोबत प्रथम दिलेल्या २० जानेवारी
२०२५ रोजीच्या निवेदनाची प्रत जोडली आहे.
आमच्या या रास्त मागणीच्या निवेदणासोबत जर आमदार, खासदार, यांनीही आपणास निवेदनाद्वारे आपण दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा, असे सांगीतले असते तर, अशी मागणी केली असती तर “तुम्ही या बाबत विचार केला नसता काय”?
या स्मरण पत्र निवेदन वर सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज या सामाजिक संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष भिमरत्न, प्रा.बी.बी.शिंदे,
महा सचिव हरिचंद्र शिंदे, कार्याध्यक्ष लक्ष्मण रोकडे, उपाध्यक्ष अशोक जावळे, सह संघटक रामभाऊ ओव्हाळ, सह सचिव लक्ष्मण सिरसट, उपाध्यक्ष ॲड. रमेश सरोदे, भिमराव ओव्हाळ, विठ्ठल लांडगे, किसनराव सरवदे, तसेच सामाजिक कार्यकर्ते मा. शंकर कुऱ्हाडे, मा. सागर ओरसे, मा.सुभाष बनसोडे, मा. मोहम्मद शहा, मा. भिमराव लष्करे, बाळासाहेब शिंदे, गोविंद गाडे, मा. मुकुंद रणदिवे (रिपब्लीकन सेना), मा. रमेश कांबळे, रवि कांबळे, मा. रामभाऊ ठोके (अध्यक्ष युवा पँथर सेना), तुकाराम गव्हाणे, दिलीप बनसोडे, गिताराम वाघमारे, प्रभाकर गायकवाड, लक्ष्मण खरात, संजय ओव्हाळ, प्रल्हाद गायसमुद्रे, सौ. सावित्री शिंदे, सौ.शालन ओव्हाळ, सौ. सुनिता कांबळे, सौ. सुदामती डोंगरे, श्रीमती/ सीमा गजभिये, सौ. रेखा वाघमारे, मा.सचिन वाघमारे (सचिव पिंपरी चिंचवड शहर) इत्यादी विविध सामाजिक संघटनेच्या, कार्यकर्ते यांच्या सह्या सह स्मरण पत्र निवेदन देवून, झोपडपट्टी वासियांच्या पुनर्वसनात ५०० चौ. फुटाचे
घर मिळावे याबाबत चा जी.आर. (शासन परिपत्रक)
काढण्यात यावे व आपणच दिलेल्या शब्दाला जागुन त्याची पुर्तता करावी. अशी स्मरण पत्रात प्रा.बी.बी.शिंदे व सहकार्यांच्या वतिने विनंती करण्यात आली आहे.



