अत्यंत संत गतीने सूरू असलेल्या ज्ञानज्योती माता सावित्रीबाई व क्रांतीसुर्य जोतीराव फुले स्मारकाच्या कामातील दिरंगाईच्या विरोधात आंदोलन..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ३१ मार्च २०२५ क्रांतीसुर्य जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम अत्यंत संथ गतीने सूरू आहे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आनंदा कुदळे, शंकरदादा लोंढे, ॲड. विद्याताई शिंदे, रोहिणीताई रासकर, विशाल जाधव, सुरेश गायकवाड यांनी वेळोवेळी आयुक्त व संबंधित ठेकेदार अधिकारी यांच्याशी चर्चा करूनही ११ एप्रिल रोजी स्मारकाचे उद्घाटन होणे शक्य नाही असेच दिसते आहे. संबंधित कामासाठी अधिकारी व आयुक्त यांच्याशी वेळ मागूनही त्यांनी वेळ न दिल्याच्या कारणास्तव दि. ०१ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता पिंपरी चिंचवड महानगरपालिका बाहेर जाण्याच्या मार्गाच्या समोर धरणे आंदोलन होणार आहे.
सदर आंदोलन हे कुठल्याही पक्षाचे नसून ओबीसी व शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आहे. असे यावेळी सांगण्यात आले.
सदर आंदोलना निमित्त उपस्थितांनी सर्व बांधवांना विनंती केली आहे की कृपया सदर आंदोलनासाठी पाठिंबा देण्यात यावा यात लवकरात लवकर स्मारकाचे काम पूर्ण व्हावे यासाठी आपण लढा उभारत आहे. कृपया सर्वांनी सहकार्य करावे अशी नम्र विनंती. त्यामुळे सदर आंदोलनामध्ये आपला सहभाग सक्रिय असावा. अशी विनंती यावेळी करण्यात आली.
यावेळी आनंदा कुदळे, शंकर दादा लोंढे, सुरेश गायकवाड, संतोष कुदळे (माजी नगरसेवक), विशाल जाधव, काळूराम अण्णा गायकवाड, ॲड. विद्याताई शिंदे, रोहिणीताई रासकर, सुजाताताई विधाते, सुजाताताई माळी, संतोष माळी, बाळासाहेब शिंदे, व असे अनेक सहकारी उपस्थित होते.