
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १८ एप्रिल २०२५ पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी वतीने अप्पर तहसील कार्यालय, निगडी येथे मोदी सरकारच्या सूडबुद्धीच्या राजकारणाविरुद्ध निषेध आंदोलन करण्यात आले.
केंद्रातील हुकूमशाही मोदी सरकार ईडी, सीबीआयचा गैरवापर करत विरोधी पक्षांना संपवू पहात आहे, त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांच्या विरोधात ईडीची कारवाई ही राजकीय हेतूने केलेली आहे. या विरोधात संपूर्ण देशात निषेध आंदोलन सुरू आहेत. मा. हर्षवर्धनजी सपकाळ, अध्यक्ष-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या आदेशान्वये पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वात केंद्रातील हुकूमशाही मोदी सरकार व भारतीय जनता पक्षाच्या विरोधात घोषणा देऊन निषेध आंदोलन करण्यात आले.
नही चलेगी नही चलेगी, मोदी तेरी तानाशाही नही चलेगी. मोदी जब जब डरता है, इडी को आगे करता है. अशाप्रकारेच घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
या प्रसंगी शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी निषेधात्मक भाषण करताना केंद्रातील हुकूमशाही मोदी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या व त्यांच्या कारभाराविरुद्ध तीव्र निषेध नोंदवला. ज्याप्रकारे लोकशाहीची पायमल्ली करण्याचे काम हे सरकार करीत आहे ते पाहिल्यावर हिटलर देखील लाजेल अशा प्रकारची टिका करण्यात आली. स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी आपले सर्वस्व दिले त्या गांधी कुटुंबीयांच्या विरोधात अशा प्रकारचे सूडबुद्धीची कारवाई करणे म्हणजे एक प्रकारे देशद्रोहच आहे. होऊ घातलेल्या काही राज्यांच्या निवडणूक पूर्वी खोट्या केसेस दाखल करून कॉंग्रेस पक्ष नेतृत्वाला बदनाम करणे हा एकमेव हेतू यामागे आहे. काँग्रेस पक्षाला घाबरून अशा प्रकारच्या कारवाया केल्या जात आहेत. परंतु काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता याला उत्तर देण्यासाठी सक्षम आहे असे कैलास कदम यांनी यावेळी सांगीतले.
यावेळी श्यामला सोनवणे, भाऊसाहेब मुगुटमल, भास्कर नारखेडे, बाबू नायर, अमर नाणेकर, वाहब शेख, प्रा. किरण खाजेकर, तुषार पाटील, मयूर जयस्वाल, ॲड. अनिरुध्द कांबळे, ज्ञानेश्वर मलशेट्टी, विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे, सोमनाथ शेळके, हिरामण खवळे, शहाबुद्दीन शेख, बाबासाहेब बनसोडे, अबूबकर लांडगे, गौरव चौधरी, केनिथ रेमी, अमरजीतसिंग पोथीवाल, सचिन कोंढरे पाटील, मुन्साफ खान, पंकज बगाडे, निर्मला खैरे, सुप्रिया पोहरे, प्रतिभा कांबळे, भारती घाग, सुनीता जाधव, सुवर्णा कदम, बबिता ससाणे, उमेश बनसोडे, महेश पाटील, विशाल सरवदे, निखिल भोईर, राहुल शिंपले, मिलिंद फडतरे, आण्णा कसबे, विकास कांबळे, भिमराव जाधव, सतीश भोसले, विंजय ओव्हाळ, सचिन गायकवाड, गौतम ओव्हाळ, संदीप शिंदे, साजिद खान, आकाश शिंदे, आशुतोष खैरे, आनंदा फडतरे, चंद्रशेखर हौन्शाळ, बसवराज शेट्टी, अमित मोरे, गणेश बंदपट्टे, साहिल पवार आदींसह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



