शहरसामाजिक

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी त्याग मूर्ती माता रमाई स्मारकाच्या जागेचे भूमिपूजन करण्याची मागणी करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी )
स्मारक समिती ज्या साठी निर्माण झाली तेच ध्येय गाठले पाहिजे, तेच काम समिती कडुन व्हावे अशी जोरदार चर्चा सर्व जनतेत सूरू होती. म्हणून पिंपरी चिंचवड शहर माता रमाई स्मारक समिती. यांच्या वतीने २०१९ पासून महानगर पालिकेकडे माता रमाई स्मारक उभे राहावे यासाठी मागणी केली जात होती. याच विषयावरती पिंपरी चिंचवड शहरांमध्ये अनेक वेळा माता रमाई स्मारक समितीच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिका समोर मोठे जन आंदोलन, उपोषण करण्यात आले. तसेच पिंपरी चिंचवड शहरांमधील तमाम बहुजन बांधवांची मागणी आहे. १४ एप्रिल २०२३रोजी. म्हणजेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी. पिंपरी येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पाठीमागील जागेवर माननीय आयुक्त साहेब. यांच्या शुभ हस्ते जागेचे भूमिपूजन करण्यात यावे. असे पिंपरी चिंचवड शहरातील आंबेडकरी अनुयायांची मागणी आहे. माता रमाई स्मारक समिती पिंपरी चिंचवड शहर यासाठी सतत आग्रही होती व आहे. शिवसेना (ठाकरेगट), राष्ट्रवादी, काॅंग्रेस, वंचित बहूजन आघाडी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दापोडी, भारतीय रिपब्लिकन फेडरेशन, रिपब्लिकन सेना पिंपरी चिंचवड शहर, हेल्पिंग हॅन्ड फाउंडेशन पिंपरी-चिंचवड महानगर पालिका हाद्दीतील सर्व संघटना पदाधिकारी व चळवळीतील कार्यकर्ते सर्वपक्षीय व संघटना मंडळे सर्वांनी निवेदने दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!