आर्थिकगून्हापोलिसमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

०४ दिवसात ४००० कि.मी प्रवास करुन सायबर फसवणुक करणाऱ्या ०४ आरोपींना धाराशिव, लातुर व जयपुर, राजस्थान येथुन अटक.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २१ मे २०२५ सायबर पोलीस ठाणे कडील फिर्यादी यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करुन त्यांना smc global securities या कंपनीचे aurora max या बनावट शेअर मार्केट ट्रेडींग ॲपद्वारे गुंतवणुक केल्यास चांगला नफा देण्याचे आमिष दाखवुन त्यासाठी त्यांना सदरचे ॲप्लीकेशन डाऊनलोड करण्यास भाग पाडुन शेअर ट्रेडिंग करीता वेगवेगळे बँक अकाऊंट देऊन त्यावर एकुण ७१,००,०००/- रुपये (एकाहत्तर लाख ) एवढी गुंतवणुक करावयास लावुन सदर रक्कम परत न करता फिर्यादी यांची आर्थिक फसवणुक केली म्हणुन फिर्यादी यांनी रितु व्होरा मो.नं. ९६०१५८०६३८, हरीश सिंग मो. नं. ८७३५८६२८४७ अजय गर्ग मो.नं. ९६०१२९४९१२ तसेच त्यांचे साथीदार व्हाट्सॲप ग्रुप चालविणारे, बँक अकाऊंट धारक व ॲप्लिकेशन धारक यांचेविरोधात कायदेशीर तक्रार दिल्याने त्यांचा सायबर पोलीस ठाणे गु.र. नं २१ / २०२५ बी. एन. एस २०२३ ३१६ (२), ३१८ (४), ३(५) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६ – डी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा तपास करण्याबाबत मा. स्वप्ना गोरे, पो. उपायुक्त गुन्हे पिंपरी चिंचवड व मा. विशाल हिरे सो, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, पिंपरी चिंचवड यांनी आदेशित केले होते . सदर गुन्हयाचा तपास करत असतांना फिर्यादी यांनी वेगवेगळया बँकेच्या अकाऊंटला पैसे ट्रान्सफर केले असल्याने त्या अकाऊंटचा तपास करीत असतांना IDFC BANK AC NO-10138658368 या अकाऊंटवर फिर्यादी यांनी ५०,००,०००/- रुपये ( ५० लाख रुपये) घेतले असल्याचे दिसुन आले होते. त्यानंतर सदर बँक अकाऊंटची माहीती घेतली असता सदचे बँक अकाऊंट हे अल्फा इंडस्ट्रीज या नावाने असुन सदरचे खाते हे अलफहाद आरिफ मोमिण वय २७ वर्षे रा. मिल्ली कॉलनी, धाराशिव (उस्मानाबाद), या व्यक्तीच्या नावाने असल्याने त्याचा शोध घेणेकरीता तात्काळ तपास पथक पाठवुन त्यास ताब्यात घेतले असता तो मिळुन आल्याने त्याच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने सदर बँक अकाऊंट हे अजय पाटील ऊर्फ शिवप्रसाद मलिकार्जुन खुदासे वय ३९ वर्षे, रा. जि. लातुर याचे सांगणेवरुन काढल्याचे व सदर अंकाउटचे किट शिवप्रसाद याला दिले असल्याचे सांगीतल्याने परत तपास पथक जि. लातुर येथे तपासकामी पाठवुन शिवप्रसाद मलिकार्जुन खुदासे याचा तांत्रिक विश्लेषणाव्दारे शोध घेतला असता त्याने गुन्हयात वापरलेले बँकेचे किट आरोपी नंबर ०३ सुर्या ऊर्फ राहुलसिंग निर्मलसिंग कर्णावत जि. झुझुनु, राज्य राजस्थान याला देऊन त्या बदल्यात त्याच्याकडुन पैसे घेतले असल्याची तपासात माहीती दिली. त्यानंतर तात्काळ तपास पथक राज्य राजस्थान येथे तपासकामी पाठवुन सुर्या ऊर्फ राहुलसिंग निर्मलसिंग कर्णावत याचा दिलेल्या पत्त्यावर शोध घेतला असता ते मिळुन येत नव्हते. त्यानंतर सपोनि प्रविण स्वामी व पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण व स्टाफ यांनी त्याचा तांत्रिक विश्लेषणाव्दारे शोध घेवुन सदर आरोपीस ट्रॅप लावुन जयपुर शहरातुन त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडे तपास केला असता त्याने आरोपी क्रमांक ०४ प्रेमशंकर बलदेव बैरागी जि. भिलवाडा, राज्य राजस्थान याच्या सोबत गुन्हा केला असल्याचे सांगीतले. त्यानंतर आरोपी प्रेमशंकर बैरागी यास देखील जयपुर येथुन शिताफीने ताब्यात घेतेले. आरोपी क्रमांक ०३ सुर्या ऊर्फ राहुलसिंग निर्मलसिंग कर्णावत व आरोपी क्रमांक ०४ प्रेमशंकर बलदेव बैरागी यांच्याकडे एकत्र तपास केला असता त्यांनी सदचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. आरोपी क्र.०२ शिवप्रसाद खुदासे हा विविध लोकांना संपर्क साधुन बँक अंकाउट काढत असे व सदरचे खाते संपुर्ण किट व इंटरनेट बँकिग पासवर्डसह आरोपी क्र. ०३ सुर्या ऊर्फ राहुलसिंग कर्णावत यास देत असे. आरोपी सुर्या व आरोपी क्र.०४ प्रेमशंकर बैरागी हे चायनीज व कंम्बोडिया, दुबई येथील लोकांचे संपर्कात राहुन सदरचे अंकाउटवर सायबर गुन्हयातील रक्कम स्वीकारत असल्याचे प्राथमिक तपासात दिसुन आले असल्याचे आरोपी क्र.०१ ते ०४ यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली असुन त्याअनुषगाने अधिक तपास सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक रविकिरण नाळे करत आहेत.
सदर गुन्हयात सायबर पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड कडील मपोउपनि विदया पाटील यांनी प्रथम धाराशिव जिल्हयातील अंकाउटधारकास ५०० किमी प्रवास करुन ताब्यात घेतले तद्नंतर पुन्हा पिंपरी ते लातुर असा ८०० किमी प्रवास करुन आरोपी क्र. ०२ यास ताब्यात घेतले. तसेच पोउपनि सागर पोमण व स्टाफ यांनी जयपुर राजस्थान याठिकाणी जावुन आरोपी क्र ०३ व ०४ यांना ताब्यात घेतले. दाखल गुन्हयातील आरोपी क्र.०३ व ०४ हे कोणत्याही प्रकारचे सिमकार्ड न वापरता केवळ व्हॉटसअपचे माध्यमातुन इतर आरोपी यांचेशी संपर्कात होते. दाखल गुन्हयातील आयडीएफसी बँक खात्यावर एकुण ३.२५ कोटी रुपयांचे व्यवहार ०२ दिवसात झाले असल्याचे दिसुन आले आहे.
सदरची कारवाई मा. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. डॉ. शशिकांत महावरकर सह पोलीस आयुक्त, मा. सारंग आव्हाड अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. स्वप्ना गोरे उपआयुक्त, गुन्हे, मा. डॉ. विशाल हिरे सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे १ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सपोनि. प्रविण स्वामी, पोउपनि सागर पोमण, पोउनि वैभव पाटील, पोउनि विदया पाटील, पोउनि प्रकाश कातकाडे, पोलीस हवालदार हेमंत खरात, दिपक भोसले, पोलीस अंमलदार अतुल लोखंडे, नितेश बिच्चेवार, प्रितम भालेराव, अभिजित उकिरडे, विशाल निचित, सुभाष पाटील, निलेश देशमुख दिपाली चव्हाण, शुंभागी ढोबळे सर्व नेमणुक सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!