उत्सवकलामनोरंजनमहाराष्ट्रविशेषशहरशुभेच्छासामाजिक

कुसुमवत्सल्य फाउंडेशन आयोजित कर्करोग व ऍसिड हल्ला पीडित रुग्णांसाठी फॅशन शो कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न..

दिमागदार व नेत्रदीपक सोहळ्यात फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशालीताई पाटील यांच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षांव..

प्रतिनिधी पुणे दि. २१ मे २०२५ कुसुमवत्सल्य फाऊंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सौ. वैशालीताई पाटील व त्यांच्या पदाधिकारी यांच्या सहकार्याने पुण्यात दि. ५ मे २०२५ रोजी खडकवासला, जावळकर फार्म रिसॉर्टमध्ये ऍसिड हल्ला व कर्करोग पीडित’ रुग्णांसाठी चॅरिटी फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. कुसुमवत्सल्य फाऊंडेशन ही संस्था गेल्या १८ वर्षांपासून समाजातील तळागाळातल्या नागरिकांसाठी कार्य करत आहे. अनेक पीडितांच्या दुःखावर फुंकर घालून त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी ही संस्था तळमळीने कार्य करत आहे. त्यांच्या या सामाजिक कार्यात हातभार लावण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. या फॅशन शो मध्ये रनवे तसेच किड्स, मिस, मिसेस, मिस्टर आणि कपल या श्रेणी मध्ये ‘फॅशन फॅक्टर’ या टायटल अंतर्गत स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये लहान मुलांची श्रेणी, मिस्टर श्रेणी, मिसेस श्रेणी व मिस श्रेणी मध्ये स्पर्धा घेण्यात आल्या.

लहान मुलांमध्ये विजेती त्रिशा विभंडिक, प्रथम क्रमांक रिद्धी छाबिले व द्वितीय क्रमांक राजवी राऊत यांनी पटकावला, मिस स्पर्धेच्या श्रेणीत विजेती म्हणून रिया मेद, प्रथम क्रमांक संस्कृती म्हामने तर द्वितीय क्रमांक भानुप्रिया कौशिक यांना देण्यात आला, त्यानंतर मिसेस श्रेणीमध्ये विजेती म्हणून पायल राऊत, प्रथम क्रमांक शीतल खेतकर तर द्वितीय क्रमांक जुही वर्मा यांनी नावावर करून घेतला तर शेवटी पुरुष श्रेणीमध्ये विजेते म्हणून देवेंद्र खोले, प्रथम क्रमांक गजानन पांचाळ तर द्वितीय क्रमांक लकी महाजन यांना देण्यात आला. सदर कार्यक्रमाला विशेष सहकार्य श्री. लक्ष्मी केटर्सच्या संचालिका चारुशीला पुरोहित ( सोनू ) यांचे लाभले. गज लक्षमीचे मालक दिलीप वगळू यांच्याकडून साडी भेट देण्यात आली तर विशारमच्या विद्या कोतवाल व अतुल गुंजाळ आणि निशा पाटील यांच्याकडून सुध्दा भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. कार्यक्रमाला माध्यम सहयोगी म्हणून ऑल मीडिया महाराष्ट्र दर्पणचे न्यानेश्वर जाधव ( माऊली ) व महाराष्ट्र मराठी न्यूजचे भारतमाता पत्रकार यांचे सहकार्य लाभले. लीना ज्वेलर्सच्या संचालक लीना मुडलिक, कृष्णा ज्वेलरी अंजली माने व रॉयल डान्स आकडमीच्या माधुरी जायभाय तसेच जावळकर फार्मचे वेणू पाटनकर आत्माराम जावळकर याचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख, रवींद्र ठाकूर, दीपिका ओसवाल, अनिल रेळेकर, ऍड. इंद्रजित डोंगरे व विकास कडू पाटील उपस्थित होते. तसेच सुविधा नाईक, अंजली गडोया, ज्योती रजनी, प्रीती कौशिक, सुमन सिंग, मनीषा बुद्धिसागर व ज्योती सुतार आदी कर्करोग रुग्ण उपस्थित होते. तसेच कोरिओग्राफर अनिल पाचंगे, परीक्षक अतुल गुंजाळ, डॉ. दुर्गा लाडके व पारुल गुप्ता.
शो ओपनिंग करिष्मा माने, शो स्टॉपर नेत्रा नागपुरे ह्यांनी केले शो डायरेक्टर अर्चना कल्याणी आणि वैशाली पाटील ह्यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामेश्वर शिंदे आणि अर्चना कदम यांनी केले. एका नैसर्गिक आणि सुंदर अशा ठिकाणी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या महिला या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरातून आल्या होत्या तसेच कर्करोग पीडित महिला यांनी रॅम्प वॉक करून सर्वांना आश्चर्यचकित करून टाकले. या नेत्रदीपक कार्यक्रमाचे आयोजन कुसुमवत्सल्य फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली पाटील, अर्चना कल्याणी, विद्या कोतवाल, रुपाली अभंगं, मनीषा समर्थ, मनिश गिरमे, स्वाती हिरवे, सुविधा नाईक, अंजली चव्हाण, मिलन पवार, विजया घुले व राजू सांगळे यांनी केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!