शौर्यदिना करिता “भिमसृष्टी” पिंपरी येथून बसेसची व्यवस्था करण्यात यावी- राजेंद्र साळवे..

प्रतिनिधी अनिरूद्ध चव्हाण पिंपरी-चिंचवड दि. २६ डिसेंबर २०२३ भीमाकोरेगाव येथे पिंपरी – चिंचवड शहरामधून हजारोंच्या संखेने भीमसैनिक शौर्यदिना निमित्त मानवंदना देण्यासाठी दरवर्षी जात असतात म्हणून दि. ०१ जानेवारी २०२४ या दिवशी त्यांची गैर सोय होऊ नये, याकरिता वंचित बहुजन आघाडी (पिंपरी चिंचवड शहर जिल्हा)च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, “भिमसृष्टी” पिंपरी येथून बसेसची व्यवस्था करण्यात यावी अशी PMPL ( पी.एम.पी.एल )चे व्यवस्थापक भास्कर दहातोंडे साहेब यांना निवेदना द्वारे विनंती करण्यात आली. त्यांनी ही लगेचच प्रतीसादात्मक भूमीका घेत “भिमसृष्टी” पिंपरी येथून १० ते १५ बसेसची व्यवस्था करण्याची हमी दिली. यावेळी शहर सचिव राजेंद्र साळवे, उपाध्यक्ष विक्की तामचीकर , शाखाअध्यक्ष शिवाजी खडसे, संघटक विजय गायकवाड, शिवाजी झोडगे, मनोज गजभार व गौतम गजभार आदी उपस्थित होते.




