आरोग्यदेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

समता सैनिक दल पिं. चिं. युनिटच्या वतीने नेत्र चिकित्सा व चष्मे वाटप… मा. मनोज गरबडे

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १ ॲागस्ट २३ रोजी, सकाळी समता सैनिक दल पिंपरी चिंचवड युनिटच्या वतीने निगडी भक्ती-शक्ती येथील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास जंयती निमीत्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी समता सैनिक दल पिंपरी चिंचवड युनिटचे संघटक व २०६ पिंपरी विधानसभेचे दावेदार मा. मनोज गरबडे यांच्या हस्ते नेत्र चिकित्सा व चष्मे वाटप शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. या अभिवादन पर शिबीरात तब्बल ४७० गरजू अनुयायांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. या प्रसंगी समता सैनिक दल पिंपरी चिंचवड युनिटचे शाखा प्रमुख व सैनिक उपस्थित होते. या शिबीरासाठी जिल्हा रूग्णालय औंध नेत्र विभागाचे डाॅ. राठोड, डाॅ. डी. जी. भागवत, डाॅ. ए. आय. दूशी व सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
अशा जल्लोषमय, उत्साहपुर्ण वातावरणात अनुयायांच्या गरजेचा व उपयोगी असा उपक्रम घेऊन लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!