मानव जन्म एकदाच..! नाही पुनर्जन्म पून्हा..!

प्रतिनीधी सतिश वि.पाटील मुंबई दि. २२ जून २०२५ भिवंडीत कामवारी नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन सख्खे भाऊ पाण्याच्या प्रवाहात बुडून गेल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय धुमाळ (२५) आणि त्याचाच मोठा भाऊ सागर धुमाळ (३०) हे दोघेही पोहायला गेले असता नदीत बुडाले. अक्षयचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडला आणि त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या सागरचाही बुडून मृत्यू झाला.
सविस्तर माहिती ही घटना भिवंडी तालुक्यातील गोरसई गावात घडली, जिथे कामवारी नदी आहे.
दोघेही भाऊ नेहमी प्रमाणे नदीत पोहण्यासाठी गेले होते.
अक्षय पाण्यात बुडत असताना, त्याला वाचवण्यासाठी सागर गेला आणि दोघेही नदीच्या प्रवाहात वाहून गेले.
स्थानिक लोकांनी आणि अग्निशमन दलाने शोध मोहीम राबवून त्यांचे मृतदेह बाहेर काढले.
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
टिप: कृपया सर्वच महाराष्ट्र राज्य व इतर राज्यात ही भरपूर प्रमाणात पाऊस पडून नदी, धरण, तलाव भरले आहेत तरी क्षणिक मौज मजे साठी धबधबे तसेच पाणी क्षेत्रात निसर्गाचा आनंद लुटण्याचा मोह सर्वच लहान मोठ्यांना होतो तरी प्रथम आपली काळजी घेणे आवश्यक आहे. मौज मजा आज नाही उद्या करु शकता पण गेलेला जीव पुन्हा मिळणार नाही. याची जाणीव ठेवून पावसाळ्याचा आंनद घ्यावा आणि जेथे धोकादायक क्षेत्र आहे तिथे ऑगष्ट महिन्यापर्यंत बंदी आहे. आता पर्यंत बरेच अपघात पावसाळ्यात झालेत आणि मृत्यू ही झालेत. अशी ठिकाणे टाळा व आपले बहुमूल्य जीवन वाचवा ! इतरांनाही सुचीत करा. घरी कोणी तरी आपली वाट पाहते आहे याची जाणिव ठेवा.
“मानव जन्म एकदाच..! नाही पुनर्जन्म पून्हा”!



