अभिवादनउत्सवमहाराष्ट्रविशेषशहरशुभेच्छासामाजिक

संविधानाचा अमृत महोत्सव आणि राजर्षी शाहू महाराज जयंती ओजस संस्थेच्या माध्यमातून उत्साहात संपन्न-समाज जागृतीचा ठरला प्रेरणादायी सोहळा..

प्रतिनिधी पुणे दि. २४ जून २०२५ संघामित्रप्रेरणा बुद्ध विहार, इंदिरा नगर, लोहगाव रोड येथे ओजस बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने संविधानाचा अमृत महोत्सव व राजर्षी शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. या विशेष प्रसंगी आयोजित चर्चासत्रात संविधानाचे महत्व, महिलांचे आरोग्य आणि नेतृत्व यासारख्या मूलभूत विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहायक आयुक्त समाजकल्याण विभाग, पुणे विशालजी लोंढे, डॉ. प्रकाश पवार (उपप्राचार्य, फर्ग्युसन कॉलेज) व डॉ. कपिल जगताप उपस्थित होते.
डॉ. पवार यांनी शाहू महाराजांचे समतावादी शिक्षण धोरण, संविधान निर्मिती प्रक्रिया आणि लोकशाही मूल्यांवर प्रकाश टाकला. डॉ. कपिल जगताप व डॉ. अंजली जंगम यांनी महिलांच्या आरोग्यावर, विशेषतः आजार, उपचार व शारीरिक तक्रारी यावर संवाद साधला. पुणे मनपा समाजकल्याण विभागाच्या समन्वयक धिवार मॅडम यांनी विविध योजनांची माहिती दिली.
विशाल लोंढे यांनी आपल्या प्रेरणादायी जीवनप्रवासाच्या आठवणी सांगताना, एका झोपडपट्टीतील मुलाचा सहायक आयुक्त होण्याचा प्रवास उलगडला. “आईने घेतलेल्या निर्णयांची मुलांच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम होतो,” असे सांगत त्यांनी उपस्थित महिलांना जबाबदार पालकत्वाचे महत्व समजावून सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवराम कांबळे होते. त्यांनी ओजस संस्थेची स्थापना, उद्दिष्टे व भावी वाटचालीबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
या प्रसंगी समाजाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या वस्तीतील महिलांचा सन्मान करण्यात आला. यात सुनंदा जाधव, रोहिणी गायगवळी, मीना गुंजाळ, भीमा साखरे, सुरेखा देवकर, सुभद्रा बसमत, कविता चव्हाण, सुरेखा वंजारी, उज्वला धोत्रे, अनिता झेंडे, पूनम जेठथोर, राधा कांबळे (विभागीय समन्वयक, कोरो इंडिया), अक्कूबाई जाधव (ओजस) यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमास खालील मान्यवर व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते:
पंचशीलाताई कुंभारकर (अध्यक्ष, ओजस संस्था), डॉ. मंगल सासवडे, विश्वनाथ घोडके, अनिता गोरे, डॉ. प्रज्ञा कांबळे, निताताई अडसुळे, प्रतिभा वानखेडे, अनिल लोहिरे, रिना सोनवणे, रमाताई आठवले, सुजाताताई नाईकवडे, डॉ. आम्रपाली मोहिते, राजन नायर, सुनील रंजवे, विकास भारसकर, शकुंतला शेलार, अंजली उपरवट, शुभांगी कुंभारे, तसेच इतर सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते ही यावेळी उपस्थित होते.
संस्थेच्या सचिव सुनिताताई गरुड यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले, तर ओहळताई यांनी मनपूर्वक आभार प्रदर्शन करत समारोप केला.
इंदिरा नगर वसाहतीतील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि त्यांचे सामाजिक प्रश्नांवरील जाणिवेचे दर्शन, या कार्यक्रमाला विशेष अर्थपूर्ण ठरवणारे ठरले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!