महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १२५ जयंती महोत्सव कमेटीने राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी केली.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २६ जुन २०२३ रोजी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १२५ जयंती महोत्सव कमेटीने” आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी केली. युगप्रवर्तक संघाच्या वतीने जेष्ठ कार्यकर्ते श्री. मगन सावंत यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रास्ताविक पर ॲड. राजेश नितनवरे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या वयाच्या १३वर्षांपासून केलेल्या कार्याची ओळख करून दिली. शिव, फुले, शाहू, आंबेडकर, विचारधारेचे सत्यशोधक कार्यकर्ता व बहुजन समाज पार्टी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष श्री सुधाकर फुले यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याची ओळख समाजातील तळागाळातील लोकांना जातिभेदा पासुन दुर करुन शिक्षणाची उनिव असल्याने अंधश्रद्धा, रुढी व ब्राम्हणवादाला शाहू महाराज यांनी विरोध केला. शिक्षणाला महत्त्व देऊन बहुजन समाजातील सर्व घटकांना शाळेत प्रवेश दिला जी मुलें जाणार नाहीत अशा पालकांना १ रुपये दंड ठोठावणारे शाहू महाराजच होते सर्व मराठा कुणबी हिंदू मुस्लिम मुलांसाठी मुलींसाठी बोर्डिंग सुरू करुन समाजात शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षणासाठी लंडनला पाठविले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांच्या मुंबईच्या चाळीत असणार्या घरी जाऊन भेट घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्कार करणारे शाहू महाराज .आणि महाड सत्याग्रह वेळी शाहू महाराज यांनी सांगितले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आता बहुजन समाजाचे नेतृत्व करणारे नेते आहेत. श्री. भालचंद्र नाईक यांनी देखील शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती दिली. अध्यक्ष स्थानी जेष्ठ नाटककार सामाजिक कार्यकर्ते खुडे साहेब यांचेही मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते बोरसे काका ह.भ.प. रामचंद्र भागवत. अमर काळुंखे, राहुल गायकवाड, राजेश धायफुले आदि मान्यवर उपस्थित होते व समाजातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सणासारखी साजरी करावी असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते. त्या पद्धतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर १२५ उत्सवसमितीने नियोजन केले होते. श्री. सुधाकर फुले यांनी कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!