अभिवादनमहाराष्ट्रमूंबईविशेषशहरशोध इतिहासाचा..सामाजिक

बुद्ध लेण्या मुक्ती आंदोलन समिती व एकजूट लेणी प्रचार प्रसार समूह यांच्या वतीने आयोजित धम्म सहल यशस्वीरित्या संपन्न..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १९ सप्टेंबर २०२५ रविवार दि. १४/०९/२०२५ रोजी ऐतिहासिक भीमसृष्टी पिंपरी या ठिकाणी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नाणेघाटच्या दिशेने प्रवास सुरू झाला.
जुन्नर नाणेघाट येथे पोहोचल्यानंतर दाट धुक्यातून लेणी कडे प्रवास सुरू झाला त्यावेळेस समोरचे काहीही दिसत नव्हते. मुख्य लेणीमध्ये पोहोचल्यानंतर लेणी प्रेमी इतिहास प्रेमी मनोज गजभार यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालनास सुरुवात केली.
पालीभाषा अभ्यासक व विविध लिप्यांच्या अभ्यासक लेणीप्रेमी सुजाताताई नवघरे यांनी या ठिकाणी सतत का आलं पाहिजे आणि आपला प्राचीन इतिहास जाणून घेतला पाहिजे या विषयी मार्गदर्शन केले.
या नंतर बोधिसत्व चॅनलचे संचालक सागर कांबळे यांनी या प्राचीन नाणेघाट विषयी आणि सातवाहन राज घराण्याविषयी व लेणीतील शिलालेखांविषयी सविस्तर माहिती सर्वांना समजावून सांगितली व महाराष्ट्रातील बुद्ध लेण्या विषयी व या लेण्यांच्या निर्मितीसाठी राजआश्रय देणाऱ्या राज घराण्यांविषयी सविस्तर माहिती दिली.
पुरातत्त्वविद् विविध लिप्यांचे अभ्यासक अशोक नगरे यांनीही प्राचीन व्यापारी मार्ग नाणेघाट विषयी व सातवाहन राजघराण्या विषयी माहिती दिली व लेणीतील शिलालेखा विषयी माहिती दिली व शिलालेख सर्वांना समजावून सांगितला. लेणीप्रेमी राम भंडारे यांनी या धम्म सहलीस उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
मुंबई येथील एकजूट लेणी प्रचार प्रसार समूह यांना नाणेघाट पायी चढून येण्यास ३ तास लागल्यामुळे उशीर झाल्यामुळे लेणी प्रेमी सारीश उर्फ/दादुस डोळस यांनी सर्वांना नाणेघाट व या लेण्यांविषयी सर्वांना माहिती दिली.
या धम्म सहलीस पिंपरी चिंचवड पुणे व मुंबई भागातील ४ बसेस वैयक्तिक फोर व्हीलर टू व्हीलर घेऊन अंदाजे ३०० सदस्य उपस्थित होते. सर्वांसाठी नाष्ट्याची व्यवस्था उपासक राम भंडारे यांच्यावतिने करण्यात आली
व पाण्याची व्यवस्था भारतीताई सूर्यवंशी यांच्यावतिने करण्यात आली
पिंपरी चिंचवड पुणे येथून आलेल्या सर्व सदस्यांची जेवणाची व्यवस्था बुद्ध लेण्या मुक्ती आंदोलन समितीच्या वतीने करण्यात आली.
ही धम्म सहल यशस्वी करण्यासाठी रवि कांबळे, महायान मसूरे तात्या, सिद्धार्थ वाघमारे, शेषेराव दुधमल, सुरेश वाघमारे, राहुल बनसोडे, अशोक बडेकर, रितेश वाघमारे, उमा कांबळे मावशी, जयश्री शिरसाठ, राम शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!