अपघातपोलिसमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

स्पाईन रोड मोशी येथील जयगणेश साम्राज्य चौकातील होर्डींग टेम्पोवर पडले, कोणतीही जिवीत हानी नाही..

पिंपरी चिंचवड दि. १७ मे २०२४ काल दि. १६ मे २०२४ रोजी स्पाईन रोड मोशी येथील जयगणेश साम्राज्य चौकातील अधिकृत परवानगी असणारे २० बाय ४० फुट आकाराचे होर्डींग आज पाऊस व वाऱ्यामुळे रस्त्यावर उभ्या असणाऱ्या टेम्पोवर पडले असून त्यामध्ये कोणतीही जिवीत हानी झाली नाही.
सदर होर्डींगचे परवाना धारक आनंद ॲडव्हर्टायझिंगचे श्री. आनंद गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. शहरातील सर्व होर्डिंग्जबाबत संबंधितांची बैठक शुक्रवार दि १७ मे २०२४ रोजी आयुक्त शेखर सिंह यांच्या समवेत होणार आहे. तसेच शहरातील सर्व होर्डींगचे स्ट्रक्चरल ॲाडीट करण्यात येत आहे.
आज झालेल्या या घटनेत सदर होर्डींग हे तेथे उभ्या असलेल्या टेम्पोवर पडल्याने किरकोळ नुकसान झाले आहे.
सदर घटनेची आयुक्त शेखर सिंह यांनी तातडीने दखल घेवून सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर व उपायुक्त संदीप खोत यांना घटनास्थळ पाहणीच्या सूचना दिल्या.
शहरातील अनधिकृत होर्डींगचे सर्वेक्षण सुरू असून सोमवार पासून त्यावर कारवाईची मोहिम सुरू करण्यात येणार असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!