शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने पिंपरीत भव्य रक्तदान शिबिर संपन्न..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २३ जुलै २०२३ पिंपरी चिंचवड शहर शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्या वतीने रविवारी भव्य रक्तदान शिबिर भरवण्यात आले होते. पिंपरी चिंचवड शहरांमध्ये प्रथमच शिवसेना पक्षप्रमुख
मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बाबासाहेब आंबेडकर स्मारक (भीम सृष्टी ) शेजारी, आंबेडकर चौक, पिंपरी या ठिकाणी शिवसेना शहरप्रमुख ॲड. श्री. सचिन भोसले यांच्या नेतृत्वामध्ये भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जवळपास १२०० रक्तदात्यांनी सहभाग घेवून शिबिरामध्ये रक्तदान केले.
या कार्यक्रमाला मा. विनायक राऊत ( खासदार, प्रवक्ते), मा. सचिन अहिर (मा.मंत्री, संपर्कप्रमुख, पुणे जिल्हा), मा. रवींद्र मेर्लेकर (उपनेते), मा. आमदार गौतम चाबुकस्वार (जिल्हाप्रमुख), सौ. लतिकाताई पाष्टे (महिला संपर्क पमुख), सौ. सुलभाताई उबाळे (जिल्हा संघटिक), सौ. शैलाताई खंडागळे (जिल्हा संघटिका), श्री
केसरीनाथ पाटील (भोसरी व पिंपरी संपर्कप्रमुख), श्री दिलीप घोडेकर (चिंचवड संपर्कप्रमुख), श्री अशोक वाळके (पिंपरी चिंचवड निवडणूक प्रभारी), योगेश बाबर (युवा जिल्हाप्रमुख) श्री. संजय दुर्गुळे (मा. नगरसेवक), श्रीराम पात्रे (मा. नगरसेवक), रेखाताई दर्शिले (मा. नगरसेविका), रवी खिल्लारे (मा. नगरसेवक), महादेव गव्हाणे (मा. नगरसेवक), हे उपस्थित होते.
सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी उस्फूर्तपणे कार्यक्रमात सहभाग घेवून स्वतः रक्तदान केले. मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणार्या अनेक नागरिकांनी रक्तदान शिबिरामध्ये स्वयंमस्फूर्तीने सहभाग घेवून रक्तदान केले.
मा. आमदार गौतम चाबुकस्वार यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. मा. विनायकजी राऊत (खासदार), श्री. मा. सचिनजी आहिर, मा. श्री. रविंद्रजी मेर्लेकर यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच भव्य प्रमाणावर रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल शहर शिवसेना पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिकांनी तसेच शहरातील नागरिक सर्वांनी कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल ॲड. श्री. सचिन भोसले यांनी सर्वांचे आभार मानले.





