गून्हापोलिसविशेषशहरसामाजिक

रेकॉर्डवरील गुन्हेगार आदर्श उर्फ मोन्या विठ्ठल लुडेकर यास चिखली पोलीसांनी केले तडीपार

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०२ मे २०२४ मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चोबे सो. यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारल्यापासून आयुक्तालयातील गुन्हेगारीचे समुळ उच्छाटन करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविलेले आहेत.
रस्त्या भरकटलेल्या मुलाना समाज्याच्या मुख्य प्रवाहात परत आणण्यासाठी त्यांनी दिशा उपक्रम सुरु केलेला आहे. या उपक्रमातून बरेचसे विधिसंघषीत बालकाना प्रबोधन करुन, त्याच्याकडील कला गुणाच्या क्षेत्रात संधी मिळवून देण्यात आलेल्या आहेत.
असे असतानाही ज्या सराईत गुन्हेगाराच्या वर्तनात सुधारणा झाली नाही त्याच्याविरोधात मोका, तडीपार सारख्या कठोर करवाया करण्यात आलेल्या आहेत.
चिखली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार आदर्श उर्फ मोन्या विठ्ठल लुडेकर वय-२२ वर्षे रा. पंचवटी हौ. सोसा. गल्ली नं. २ यश प्लाजा जवळ, शरदनगर, चिखली, पुणे हयाचे वर्तनातही सुधारणा होत नव्हती. तो काहीएक कामधंदा करीत नसुन त्याने स्वतःची गँग तयार केलेली होती. तो घातक शस्त्रे जवळ बाळगुन चिखली पोलीस स्टेशनच्या व आसपासच्या परिसरात त्याचे गुंड साथीदारांसह गंभिर स्वरुपाचे गुन्हे नियमितपणे करीत होता. त्याचेवर चिखली पोलीस स्टेशन मध्ये जबरी चोरी, अवैध रित्या शस्त्र जवळ बाळगणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, गंभीर दुखापती करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असुन त्याच्या या गुंडगिरी व दादागिरीमुळे चिखली परीसरात दहशत निर्माण झालेली होती. त्याच्या दहशतीमुळे व भिती पोटी सर्व सामान्य नागरीक त्यास विरोध करण्यास किंवा पोलीसांकडे तक्रार देण्यास सहसा धजावत नव्हते. त्याच्या गुंडगिरी मुळे परिसरातील सभ्य नागरीक तसेच लहान मोठे व्यवसायीक, गोरगरीब जनता याना दैनंदिन जिवन जगणे, व्यवसाय करणे कठीण होत चालले होते.
त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये त्याची असलेली दहशत व गुंडगिरी मोडुन काढण्याचे उद्देशाने चिखली पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.ज्ञानेश्वर काटकर त्याचेविरुध्द तडीपारीचा प्रस्ताव तयार करुन तो मा. श्री. शिवाजी पवार, पोलीस उपआयुक्त सो, परिमंडळ -३ यांना सादर केला होता. मा. पोलीस उप आयुक्त डॉ. शिवाजी पवार सो. यांनी सदर प्रस्तावाची गंभीरपणे दखल घेत रेकॉर्डवरील गुन्हेगार आदर्श उर्फ मोन्या विठ्ठल लुडेकर यास पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पुणे शहर आयुक्तालय व पुणे ग्रामिण चे हद्दीतुन दोन वर्षाकरीता तडीपार करण्याचे आदेश पारित केले आहेत. त्यानुसार आज रोजी आरोपी आदर्श उर्फ मोन्या विठठल लुडेकर यास दोन वर्षाकरीता नागपुर येथे तडीपार केलेले आहे.
पोलीसांच्या या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकामध्ये सुरक्षतेची भावना निर्माण झाली असुन चिखली परिसरातील नागरिकांनी पोलीसांच्या या तडीपारीच्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले आहे. चिखली परीसरात गुंडगिरी व दहशत निर्माण करणा-या गुन्हेगारावर यापुढेही अश्या प्रकारची कडक कारवाई करण्यात येइल असे अश्वासन चिखली पोलीस स्टेशनचे वरीष्ट पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर काटकर यांनी नागरीकांना दिलेले आहे.
सदरची कामगिरी मा. श्री. शिवाजी पवार, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-३, पिंपरी चिंचवड, मा. श्री. संदीप हिरे, सहा. पोलीस आयुक्त, भोसरी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. ज्ञानेश्वर काटकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, चिखली पोलीस स्टेशन यांचे अधिपत्याखाली स. पो. नि. उदधव खाडे, पोउपनिरी/ राजेश मासाळ, पोहवा / १५४६ सचिन गायकवाड, मपोहवा / ११३७ दुर्गा केदार यांनी पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!