माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांचा वाढदिवस विवीध कार्यक्रमाने संपन्न…

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ३० ऑगस्ट २०२३ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष व नेते संजोग वाघेरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत बॉडीपल्स थेरेपी कॅम्प तसेच वृक्षारोपन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कॅम्प गुरूवार दि.२४ ते दि.२५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० ते ६ यावेळेत संजोग वाघेरे पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर पिंपरीगाव घेण्यात आला.
बॉडीपल्स थेरेपी कॅम्पमध्ये मधुमेह, पार्किन्सन, व्हेरिकोज व्हेन्स, सांधेदुखी, थायरॉईड, पाठदुखी, कंबरदुखी, निद्रानाश, अर्धांगवायू , टाचदुखी, सायटीका, गुडघेदुखी, मायग्रेन, स्पॉंडिलेसिस, मासिक पाळीत होणारा त्रास, हार्मोन्स प्रॉब्लेम्स, अन्नपचन संबंधित समस्या, मज्जातंतू व स्नायू संबंधित समस्या, वजन वाढणे व कमी होणे या आजारावरती थेरेपी करण्यात आली.
या मोफत बॉडीपल्स कॅम्पचे आयोजन नगरसेविका उषाताई वाघेरे पाटील, युवानेते ऋषिकेश वाघेरे पाटील यांच्यावतीने करण्यात आले होते. त्यामध्ये पिंपरीगाव व परिसरातील जास्तीजास्त नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसादाने या थेरेपी कॅम्पचा लाभ घेतला.
तसेच येरवडा मेंटल हॉस्पिटल येथे प्रवीण नाणेकर यांच्यावतीने खाऊ वाटप तसेच यशवंतराव चव्हाण संस्था येथे ब्लॅंकेट व रोख देणगी देण्यात आली.
वाढदिवसानिमित्त भोसरी विधानसभा प्रथम आमदार मा.श्री.विलास लांडे, मा.श्री.अण्णा बनसोडे, भाऊसाहेब भोईर, नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, मा. विरोधी पक्ष नेते राहूल भोसले यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून शूभेच्छा दिल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड येथील पक्षाचे सर्व कार्यकर्ते सहभागी झाले होते. पक्षाचे सर्व पदाधिकारी व समस्थ पिंपरी ग्रामस्त उपस्थित होते.





