उत्सवक्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रमूंबईविशेषशहरशुभेच्छा

थायलंडच्या भूमीवर भारताचा तिरंगा (अभय ठाकूर )

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. २५ ऑगस्ट २०२६ पॉवरलिफ्टिंगमध्ये दोन सुवर्णपदके थायलंडमधील चियांग माई येथे आयोजित UWSFF जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारे Taurus The Gymचे मालक अभय धनाजी ठाकूर यांनी दमदार कामगिरी करत दोन सुवर्णपदकांची कमाई केली. ७५ किलो वजन गटातील Bench Press प्रकारात तब्बल २०० किलो वजन उचलत त्यांनी भारतासाठी सुवर्णपदक पटकावले. तसेच Equipped Bench Press प्रकारातही सुवर्णपदक मिळवत त्यांनी आपल्या नावावर दोन सुवर्णपदकांचा मान नोंदवला. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे खोपटे गाव, उरण तालुका आणि रायगडच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
थायलंडच्या भूमीवर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवत अभय ठाकूर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उंचावले आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले असून, त्यांची कामगिरी युवा खेळाडूंसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. Taurus The Gym परिवारासह क्रीडाप्रेमी, प्रशिक्षक आणि नागरिकांकडून त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. उरणच्या क्रीडा क्षेत्रासाठी ही दोन सुवर्णपदके प्रेरणादायी ठेवा ठरणार असून, अनेक युवा खेळाडूंना पॉवरलिफ्टिंगकडे वळण्यासाठी नवी ऊर्जा मिळेल, अशी अपेक्षा क्रिडाप्रेमी मध्ये व्यक्त होत आहे. पुढील वाटचालीस अनुवाद आपला न्यूज चॅनलच्या वतीने हार्दिक शुभेच्छा!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button