आर्थिकमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

मधु ताराच्या वतीने पुण्यातील दापोडी भागातील जयभीम नगर येथे दिव्यांगाच्या घरी जाऊन मोफत वॉकर भेट.

प्रतिनिधी पूणे दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष नितीनजी शिंदे यांच्या वतीने पुण्यातील दापोडी भागातील जयभीम नगर येथील ५९ टक्के पायात दिव्यांग असलेल्या सुनीता शंकर काची यांना त्यांचा सांभाळ करीत असलेल्या आणि सुनीता हिच्या साठी वॉकर साठी विनंती करणाऱ्या ६० टक्के दिव्यांग अल्प दृष्टी बाधित शांताबाई रिठे यांच्या घरी जाऊन मोफत वॉकर भेट देण्यात आला.
हा वॉकर आणि ५०० रु. ची आर्थिक मदत आपण ही समाजाचे देणे लागतो या भावनेने माणसातील देव पुण्यातील चर्होली येथील अशोकजी शिंदे यांच्या माध्यमातून शांताबाई रिठे यांना मधु ताराच्या कार्याला पाहून देण्यात आली या पवित्र क्षणी अशोकजी शिंदे यांच्या सहचारिणी सौ. शिंदे ताई याही उपस्थित होत्या.
या प्रसंगी मधु तारा प्रमुखांचे गुरुवर्य मुंबईचे आदरणीय धनंजय पवार साहेब, मधु ताराचे दिव्यांग राज्याध्यक्षा निर्मलाताई चौधरी तसेच पिंपरी चिंचवडच्या वासंतीताई जाधव यांची फोन वरून रिठे ताई यांना मधु तारा तुमच्या सोबत आहे. आणि लवकरच रिठे ताई आणि सुनीता काची यांना मधु ताराच्या वतीने संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी चर्चा करण्यात आली.
या वेळी ओळख क्षण भराची पण कार्य आयुष्यभराच्या समाधानाचे असे म्हणत अशोक शिंदे साहेबांचे आभार मधु तारा प्रमुख नितीनजी शिंदे यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!