आंदोलनपिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

प्रभाग क्र. १३, दुर्गानगर चौक ते निगडी बस स्टॉप दरम्यान डावीकडील फुटपाथवरील बेंचेस तात्काळ काढून टाकणे अन्यथा मनसे जेसीबी द्वारे काढून टाकणार..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०९ मे २०२६ प्रभाग क्र. १३ मधील यमुनानगर कॉर्नर (दुर्गानगर चौक) ते निगडी बस स्टॉप या रस्त्याच्या डाव्या बाजूस ‘अर्बन स्ट्रीट’ प्रकल्पांतर्गत विकसित केलेल्या फुटपाथवर बसविण्यात आलेले बेंच नागरिकांसाठी गैरसोयीचे ठरत आहेत.
सदर बेंचेसमुळे निर्माण होणाऱ्या समस्या:
विशेषतः पादचाऱ्यांना..
१) ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना चालण्यास अडथळा निर्माण होत आहे.
२) रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन येथे गैरप्रकार घडत आहेत. तरुण-तरुणी आक्षेपार्ह वर्तन करताना आढळतात.
३) बेंचेसच्या आजूबाजूला दारूच्या रिकाम्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे, कंडोमची पाकिटे इत्यादी आक्षेपार्ह वस्तू मोठ्या प्रमाणात आढळून येतात
सध्याची महिला अत्याचारांची परिस्थिती पाहता ही बाब अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे.
तरी आपणास विनंती करण्यात येते की, सार्वजनिक हित व नागरिकांच्या, विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेचा विचार करून खालील कार्यवाही तातडीने करावी. अशा स्वरूपाचे निवेदन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्ताना देण्यात आले.
उपाय
१) दुर्गानगर चौक ते निगडी बस स्टॉप दरम्यानच्या फुटपाथवरील सर्व बेंचेस तात्काळ काढून टाकावेत.

२) सदर परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्यासाठी पथदिवे (स्ट्रीट लाईट) बसविण्यात यावेत.

३) पोलीस आयुक्तांशी समन्वय साधून रात्रीच्या वेळी नियमित पोलीस गस्त वाढविण्यात यावी.

उपरोक्त मागण्यांवर महापालिका प्रशासनाने पत्र मिळाल्यापासून ७ दिवसांत ठोस कार्यवाही न केल्यास, नागरिकांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून स्वखर्चाने जेसीबी लावून सदर बेंचेस काढून टाकण्यात येतील, याची कृपया गांभीर्याने नोंद घ्यावी. असे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पिं.चिं. शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी निवेदनाद्वारे पालिका आयुक्ताना कळवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button