सोनोरी गावात वाघिणीची दहशत.२२ वर्षीय तरुणी ठार.

प्रतिनिधी अविनाश गोंडाणे अमरावती दि. ०७ सप्टेंबर २०२६ चांदुर बाजार तहसील मधील सोनोरी गावात वाघिणीची दहशत.
सकाळी ११वा. चे दरम्यान सोमा नामक आदिवासी बांधव बकऱ्या चारण्यासाठी जात असतांना गावानजीकच्या अंबामाता परिसरातील नाल्याजवळ एका वाघिणीने बकरीवर हल्ला केला त्यात एक बकरी मृत झाली व एक जखमी आहे.
दुपारी ४ वा. चे दरम्यान घराशेजारील असलेल्या शेतात चारा कापण्यासाठी गेलेल्या २२ वर्षांच्या उर्मिला इवने नामक तरूणीवर वाघाचा हल्ला.
उर्मिला चारा कापत असताना वाघ तिच्या दिशेने येत असल्याचे पाहून झाडावर चढण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणीवर हल्ला चढवला व झाडीत फरफटत नेले. तरूणी मृतावस्थेत गावकऱ्यांना आढळून आली.
त्यामुळे गावात संतापाची लाट उसळली. संतप्त जमावाने वनविभागाची गाडी फोडण्याचा प्रयत्न केला असे ही समजते.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. गावात असुरक्षेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
आताच मिळालेल्या महिती नुसार या वाघीणीला वनविभागाने जेरबंद केले आहे असे समजते.



