आंदोलनमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

झनकारच्या नावाने शहरा लगत होतोय अश्र्लिलतेचा कळस- बाळासाहेब जाधव

राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी भोसरी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी दि. ०९ ऑक्टोंबर २०२३ रोजी पून्हा एकदा मा. पोलिस आयुक्त, पुणे शहर पोलिस आयुक्तालय, यांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे की धानोरी गाव पुणे येथील “झंकार सांस्कृतिक कला केंद्र” मुळे शहरात या सांस्कृतिक कलाकेंद्राचे आसपास राहणार्‍या सर्व सामान्य सभ्य कूटूंबांना होणारा मानसिक त्रास व लोकांची होणारी लुटमार पाहता या “झंकार सांस्कृतिक कला केंद्र” नावाच्या (चौफूल्यावरील) अश्र्लिल मादक लावणी प्रकाराला त्वरीत बंद करण्यात यावा. व सभोवताली राहणार्‍या महिला मूलिंना मोकळा श्वास घेवू द्यावा.
उपरोक्त विषयांस अनुसरून मी बाळासाहेब जाधव आपणांस विनंतीपुर्वक निवेदन सादर करतो की, आपल्या हद्दीमध्ये झंकार सांस्कृतिक कलाकेंद्राच्या नावाखाली विविध प्रकारच्या मादक द्रव्याचे सेवन करून, रात्री-अपरात्री मोठ्यामोठयाने आवाज करणे, भांडणतंटा, धांगडधिंगा या सांस्कृतिक कलेच्या नावाखाली तेथील नागरिकांना नाहक त्रास भोगावा लागत आहे व तेथे येणाऱ्या लोकांची सुध्दा आर्थिक फसवणूक करून त्यांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे काम हे “झंकार सांस्कृतिक कलाकेंद्र” करत आहे. या विरोधात आम्ही वेळोवेळी प्रत्रव्यवहार केला. पण पोलिस यंत्रना लक्ष देत नाही म्हणून या वेळी आयूक्त साहेब आपण या निवेदनाकडे विशेष लक्ष घालून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आम्ही राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आपल्या पोलिस आयुक्तालय पुणे येथील कार्यालयासमोर १९ ऑक्टोबर २०२३ रोजी अमरण उपोषण करणार आहोत असा इशाराच या वेळी देण्यात आला आहे.
असे निवेदना द्वारे राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टीचे भोसरी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी या वेळी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!