उत्सवकलाक्रीडाभेटीगाठीमनोरंजनमहाराष्ट्रमूंबईविशेषशहरसामाजिक

आगरी ग्रंथालय चळवळ”सरावन सरी” (श्रावण सरी) पर्व ३ रे मंलगगड कल्याण येथे संपन्न..

प्रतिनीधी सतिश वि.पाटील मुबंई दि. १९ ऑगस्ट २०२५ “आगरी जपाची ना आगरी जापाची”अशी ज्यांना मनापासून कळवळ असते असे आगरी ग्रंथालय चळवळ ज्यांनी घेतले समजाचा कल्याण करायचा ध्यास असा “समाज कल्याण न्यास” मिळून केलेला कार्यक्रम.
सरावन सरी पर्व ३ रे श्रीमलंग गडाचा पायथा, निसर्गाच्या सान्निध्यात, तिथला धबधबा भारीच, निसर्ग सौंदर्य हे सगळ्यात भारी होते. यंदा खास आकर्षण ह.प.भ. जगन्नाथ पाटील महाराजांचे प्रवचन, आगरी शौर्यगाथा, चर्चासत्र, सर्वच कार्यक्रम भारी झाले. कविसंमेलन मध्ये जय म्हात्रे याने डाॅ.शोभा ताई पाटील यांच्या कलागुणांवर आधारित कौतुकास्पद कविता केली होती. त्याचे कारण आपली डाॅक्टरी पेशा सांभाळून त्या प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असतात. खेळक्रीडा प्रकारात धावण्याच्या स्पर्धेत अनेक पुरस्कारप्राप्त केलेत. नाचगाणी, गायनाची आवड, वक्तृत्व व प्रस्तावना, समाजाच्या सर्व कार्यक्रमात स्वतःला झोकून कार्य करीत असतात. “सरावन सरी” या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व अधिक भर देण्याचे काम सर्वेश तरे यांनी केले, दया दादाला यांनी व त्यांच्या टीमने मनापासून रांत्रंदिवस मेहनत घेतली व हा कार्यक्रम उभा केला. हा कार्यक्रम समाजाच्या उत्कर्षासाठी एक नंबरचा कार्यक्रम होता. असे अनुवाद आपला न्युजचे प्रतिनिधी सतिश वि.पाटील (मुंबई पत्रकार) यांनी यावेळी सांगीतले. या कार्यक्रमाला समाजातील दिग्गज मान्यवर व समाज बांधव उपस्थित होते.
महीलांसाठी फेऱ्यांची गाणी हा कार्यक्रम फेऱ्या किंवा फेर धरून नाचने ही आगरी समाजाची संस्कृती व परंपरा दर्शवते. गणपती व होळीला हा नाच करतात. यात मध्ये एक महिला गात असते व दूसरी व्यक्ती ढोलकी वाजवत असते यांचे भोवती महिला गोलाकार करून नाचतात. त्याच्या गाण्यात पौराणिक कथा असतात देवाधर्माच्या तसेच त्यांच्या जीवन शैलीवर आधारित गाणी असतात.
यावेळीच्या गायिका होत्या मथुराबाई म्हात्रे उरण खोपटा, द्वारका बाई केने आयरे गाव, दोघींनी जुनी गानी सादर केली. दादूस आणि जगदीश दादा पण फेर धरून नाचले.
त्यानंतर बांगुऱ्या फेम व ज्यांनी धवलागीत सुरताल मिळवून दिले त्या चंद्रकला ताई दासरी आणि कवयत्री, लेखक, व समाजसेविका धवलारिन संगीताताई पाटील तसेच ज्यांनी सगळ्यात आधी फेऱ्यांची गानी व्हिडिओ, ऑडिओ च्या माध्यमातून व्हायरल केले ते गायक, कवी, संगितकार गीतकार व किसन फुलोरे दादा तसेच गायक, संगीतकार गीतकार लेखक साहित्यिक दया नाईक. ह्या चौघांनी नंतर एवढी सुंदर गाणी गायली की आयोजक, संमेलन अध्यक्षांसह सर्वच मंत्रमूग्ध होत नाचायला लागले. लोकशाहीर (काशीनाथ चिंचय) यांच्या स्मरणार्थ वेसावकर आणि नातेवाईक यांचे स्मृतिचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले. या वेळी मंलगगड इतिहास संशोधक यांचे ही चर्चासत्र झाले.
एकून काय तर कार्यक्रम हिट होता. सर्वांनीच मनसोक्त एन्जॉय केला.
याप्रसंगी आयोजकांनी महीला वर्गाला विनंती केली की आपण बेबी शॉवर, हळदी, पाचव्या, साखरपुडा, वाढदिवस, लग्न, पार्लर शॉपिंग, बैठक सगळीकडे जाता मग आपल्या “सरावन सरीला” पण येत जा.. समाजाच्या कार्यक्रमात पण येऊन बघा हा कार्यक्रम निशुल्क असतो. पुर्ण दिवसभर पिकनिक सारखा आगळा वेगळा आनंद घेता येतो. येथे पारंपारीक पद्धतीचा नाश्ता, जेवणाची उत्तम सोय करण्यात येते. वेग वेगळ्या गावातील शहरातील लोक एकत्र येतात नवीन ओळखी होतात. प्रत्येक वेळी ठिकाण बदलले जाते.
पहीले पर्व हे दिंडीगड भिवंडी येथे होते, दुसरे पर्व बालयोगी सदानंद महाराज आश्रम वसई येथे होते, तीसरे पर्व मंलगगड पायथा कल्याण पूर्व येथे संपन्न झाले. साहित्यिक, गायक, कवी आणि श्रोते मोठ्या संख्येत उपस्थित राहून “सरावन सरी” या पर्वणीचा मनमुराद आनंद घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!