दर वर्षी प्रमाणे यंदा ही पिंपरी-चिंचवडला संतश्रेष्ठ तूकोबारायांच्या पालखीचे आगमन..

प्रतिनिधी-पिंपरी-चिंचवड येथे सालाबादा प्रमाणे यंदा ही “भारत राष्ट्र समितीचे” चिंचवड विधान सभा समन्वयक यांच्या घरी “जगतगुरू श्री. तुकाराम महाराज” यांच्या दिंडीचे आगमन झाले. दिंडी क्रमांक ३०३ रेडणी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील जय हनुमान दिंडी दादासो खाडे महाराज(चालक) ह.भ.पा. नितीन महाराज पिसाळ (विनेकरी) ह.भ.पा. दादासो नवनाथ महाराज पिसाळ (दिंडी प्रमुख) ह.भ.पा. दादसो. महादेव खाडे, ह.भ.पा. ददासो. मोहिते गुरुजी किसन महाराज वाघ, ह.भ.पा. शरद महाराज कालकुटे, ह.भ.पा. लक्ष्मण महाराज काळकुटे यांची दिंडीचे वर्ष ९वे आगमन उत्साहात पार पडले या वेळी “भारत राष्ट्र समितीचे” जाधव साहेब, वाहिद शेख, प्रफुल्ला मोतलिंग, ॲड. सावंत व स्थानिक मंडळी सुरेश पाटील, माऊली खेडकर, तुषार जांब्रे, किशोर पाटील, भुषण पाटील, शिवलिंग सपाटे, व असंख्य दिंडीप्रेमी उपस्थित होते. व सर्वांनी अन्नदानाचा (प्रसादाचा) अस्वाद घेतला.




