महाराष्ट्रमूंबईवाहतूक कोंडीशहर

कोपरीपुल मुलुंड- ठाणे पूर्व द्रुतगती महामार्ग येथे क्रेन अपघाता नंतर वाहतूक कोंडी..

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. ०९ एप्रिल २०२६ ठाणे-मुंबई पूर्व द्रुतगती महामार्गावर कोपरी पुलावर काल दि. ८ एप्रिल २०२६ रोजी क्रेन उलटल्यामुळे भीषण वाहतूक कोंडी झाली, ज्याचा परिणाम मुलुंडपर्यंत जाणवत होता. या अपघातामुळे साकेत ते कोपरी आणि मुलुंड ते ठाणे दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नोकरदारांना मोठा फटका बसला असून पोलिसांनी वाहतूक वळवली आहे.
वाहतूक कोंडीची सद्यस्थिती आणि उपाय: साकेत उन्नत मार्गाच्या कामादरम्यान कोपरी उड्डाणपुलावर हायड्रॉलिक क्रेन कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली.
परिणाम: माजिवडा जंक्शन, कोपरी पूल, तीन हात नाका आणि मुलुंड पूर्व परिसरातील वाहतूक पूर्णपणे कोंडीत सापडली आहे.
पर्यायी मार्ग: वाहनचालकांनी मॉडेला चेक नाका – एलबीएस मार्ग वापरण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
अपडेट्स: परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तरीही वाहतूक पूर्ववत होण्यास वेळ लागू शकतो असे वाहतूक विभागाने सांगीतले होते.
प्रवास टाळण्यासाठी किंवा पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अशा वारंवार घटनाक्रम कधी थांबणार का? नेहमीच मेट्रो,तर कधी चुकीचे नियोजन यामुळे सामान्य जनतेला कठीण समस्याचा सामना करावा लागत आहे. याला जबाबदार कोण? ठेकेदार, प्रशासन का सरकार,,, दाद कोणाकडे मागायची.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!