अनधिकृतआंदोलनघोटाळेमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

काळाखडक पुनर्वसन प्रकल्पातील गैरव्यवहाराची चौकशी होईपर्यंत प्रकल्पाला स्थगिती..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०४ डिसेंबर २०२४ काळाखडक येथील नागरिकांच्या वतीने काळाखडक मधील मूळ नागरिकांना न्याय मिळावा तसेच काळाखडक पुनर्वसन प्रकल्पातील गैरव्यवहार व भ्रष्टचार विरोधात मागील अनेक महिन्यांपासून पाठपुरावा सुरु आहे . काळाखडक येथील रहिवाश्यांच्या वतीने अपना वतन संघटनेने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण सोबत सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. तसेच वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून प्रकल्पातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली होती.
दि. २२/१०/२०२४ रोजी अपना वतन संघटनेने मा. विभागीय आयुक्त, पुणे यांना लेखी तक्रारी द्वारे झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालय येथे उप जिल्हाधिकारी श्री . दत्तात्रय कवितके, तहसीलदार सौ . लैला शेख, नायब तहसीलदार श्री. सूर्यकांत पठाडे, सर्व्हेक्षक प्रवीण घुलगे या एसआरए अधिकाऱ्यांनी विकसकाशी संगनमत करून, सर्व्हे न. १२४/१ काळाखडक, वाकड येथील प्राथमिक पात्रता यादी, आर्थिक लाभ मिळवण्याच्या उद्देशाने बनावट खरेदीखत बनवून, खोट्या कागदपत्राद्वारे सदोष, चुकीची व बोगस यादी तयार केल्याप्रकरणी चौकशी करून संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी विभागीय आयुक्त, पुणे यांचेकडे तक्रार केली होती. त्यानुसार तक्रार निवारण समिती, विधानभवन यांनी सदर प्रकल्पाची चौकशी होईपर्यंत स्थगिती देणेबाबतचे पत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्याधिकारी निलेश गटणे याना पाठवले आहे. याबाबत काळाखडक येथील स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून प्रकल्पाच्या नावावर होणार करोडो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आणल्याबद्दल अपना वतन संघटनेविषयी आभार व्यक्त केले. यावेळी बोलताना सिद्दीकभाई शेख म्हणाले कि, काळाखडक झोपड्पट्टीमधील प्रत्येक नागरिकाला हक्कच घर भेटले पाहिजे. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात नागरिकांची होणारी फसवणूक थांबली पाहिजे. तसेच विकसक व एसआरए अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार बंदच झाला पाहिजे अशी आमची भूमिका होती परंतु पैशाच्या व गुंडगिरीच्या जोरावर विकसक प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न करीत होता. स्थानिक नागरिकांच्या सर्व अटी व शर्थीचे पालन करण्यात विकसक अपयशी ठरलेला आहे. त्यामुळॆ स्थानिक नागरिकांचा या प्रकल्पाला प्रचंड विरोध होता. अशा परिस्थितीत नागरिकांच्या हक्कांसाठी कोणीही नेते पुढाकार घेत नसल्याने त्यांनी अपना वतन संघटनेला विनवणी केली आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना अनेक अडचणी येऊनसुद्धा सातत्याने अन्यायाविरूद्धचा लढा देत आहे व देत राहिल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!