गून्हापोलिसमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

बलत्कार करून देहविक्री करण्यासाठी जबरदस्ती करणार्‍या पती व सासर्‍याला कडक शासन करा-शिवाजी खडसे

प्रतिनीधी पिंपरी-चिंचवड दि. ०४ डिसेंबर २०२४ पिंपरी चिंचवड शहरात भोसले चाळ, जामा मशीद जवळ कासारवाडी या ठिकाणी मुस्लीम महीलेवर पती व सासरा यांनी जवळपास दोन वर्ष बळजबरीने देहविक्री करून घेतली आहे.
पिडीत मुस्लीम महीलेला दि. १८ सप्टेंबर २०२४ रोजी पती व सासरा यांनी मारहाण केल्याने स्वताचा जीव वाचवण्या साठी रात्रीच्या वेळेस माहेरी मुंबईला गेली व दि १९ सप्टेबर २०२४ रोजी टिळकनगर पोलिस स्टेशन चेंबुर याठिकाणी गुन्हा दाखल केला आहे.
त्या अनुषंगाने भोसरी पोलिसस्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर ५८७/२०२४ पीटा अधिनियम कलम ३,४,५ व भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११५ (२) १४३ अ, ४३ (१) व १४२ (२) तसेच ३ (ड) ६४ तसेच स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमचे कलम ३, ४, ५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
राज्यशासनाने सदर गुन्हा जलद गतीने शिवाजी नगर न्यायालयात चालवुन पिडीतेल्या न्याय मिळवुन द्यावा तसेच तीचे व मुलांचे पुणर्वसन करण्यासाठी शासकीय अर्थीक मदत तात्काळ देण्यात यावी अशी मागणी शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शिवाजी खडसे यांनी संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांच्या मार्गदर्शनाखाली गृहमंत्री देवेंन्द्रजी फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे इमेलद्वारे निवेदन देऊन मागनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!