आरोग्यमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

“मोशी येथील वस्तीगृह परिसरात वृक्षारोपण करण्यात आले” सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड, दिनांक 8 जुलै २०२३ पिंपरी चिंचवड महानगरपालिका व सामाजिक न्याय विभागाचे शासकीय वस्तीगृह यांच्या वतीने मोशी येथील वस्तीगृह परिसरात सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मोशी येथे सामाजिक न्याय विभागाचे मुलांचे 250 विद्यार्थ्यांसाठीचे वस्तीगृह तसेच 250 मुलींसाठी चे वस्तीगृह आहे. या परिसरात असणाऱ्या मोकळ्या भूखंडावर सुमारे 250 वृक्षांची लागवड आज करण्यात आली. यावेळी वसतिगृहाचे गृहपाल विवेक जवळकर, महिला वस्तीगृहाच्या गृहपाल प्रमिला आमले, मीनाक्षी नरहरे व महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे सहाय्यक उद्यान अधीक्षक राजेंद्र वसावे तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. या ठिकाणी करण्यात आलेल्या वृक्षारोपणाच्या संवर्धनाची जबाबदारी विद्यार्थ्यांनी घेतली असून प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!