आरोग्यऔद्योगीकमहाराष्ट्रमूंबईशहरसामाजिक

वसई, तारापूर औद्योगिक क्षेत्रात अचानक वायू गळती भितीचे वातावरण..

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. ०४ मार्च २०२६ तारापूर औद्योगिक क्षेत्रात अचानक वायू गळती, नागरिकांच्या डोळे आणि घशाला त्रास, प्रशासनाचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु.
पालघरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीत वायू गळती होत आहे. या वायू गळतीमुळे कंपनी आणि आजूबाजूच्या परिसरातील कामगार, नागरिकांना श्वसन, घसा खवखवणे, डोळे चुरचुरणे यांसारखे त्रास जाणवू लागले. या घटनेनंतर प्रशासन सतर्क झालं आहे.

पालघर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भघेरिया केमिकल्स कंपनीत ओलियम वायूची गळती झाल्याने परिसरातील कामगारांना आणि नागरिकांना वायुगळतीचा त्रास होऊ लागला आहे. ओलियम वायू हवेच्या संपर्कात आल्याने सल्फर डायऑक्साईड आणि इतर सल्फरस ऑक्साईडची निर्मिती होऊन त्याचा परिणाम परिसरात होऊ लागला. ‘डी’ झोनमधील भघेरिया केमिकल्स कंपनीत दुपारी अडीच वाजताच्या सुमारास वायू गळती सुरू झाली. वाऱ्याची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे असल्याने सल्फर डायऑक्साईड आणि इतर सल्फरस ऑक्साईड्सची निर्मिती होऊन त्यामुळे परिसरातील कामगार आणि नागरिक बाधित झाले असून डोळ्याला चुरचुरणे, डोळे लाल होणे, घशामध्ये कोरड पडणे, घसा खवखवणे असे त्रास जाणवू लागले.
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी आपत्कालीन व्यवस्था कक्ष तसेच महसूल आणि इतर यंत्रणेला सतर्क केले आहे. अग्निशामन दलाचे जवान, पोलीस प्रशासन यांच्यासह पोलीस अधीक्षक यातीश देशमुख घटनास्थळी दाखल झाले असून ओलियम गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक यातिश देशमुख काय म्हणाले?
पालघरचे पोलीस अधीक्षक यातिश देशमुख यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. “आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास भोईसर पोलीस ठाणे हद्दीत भघेरिया केमिकल्स येथे सस्पेक्टेड ओलियन गॅस गळती झाली आहे. गॅस अजूनही बाहेर येत आहे. MIDC, अग्निशामक दल, पोलीस विभाग तसेच इतर विभागांच्या मदतीने हा गॅस कसा थांबवता येईल? याचा प्रयत्न करण्यात येत आहे”, असं यतिश देशमुख म्हणाले.
“पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना विनंती करण्यात येत आहे. हा गॅस जिथून लीक होत आहे तो ज्या वाऱ्याच्या दिशेला जात आहे त्या वाऱ्याच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने प्रवास करावा. तोंडाला ओला रुमाल किंवा मास्क लाऊन वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला जावं. विरुद्ध दिशेला जात असताना घाई किंवा धावपळ करु नये. कारण त्यातून अपघात होण्याची शक्यता आहे. नागरिकांना यासंदर्भात विनंती करण्यात येत आहे की, प्रशासनाचे पूरेपूर प्रयत्न सुरु आहेत. आपण जे धुराच्या लोटापासून वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला जावून सुरक्षित ठिकाणी जावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं अस आवाहन पोलीस अधीक्षक यातिश देशमुख यांनी यावेळी केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!