पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना महानगरपालिकेच्यावतिने मदत करण्यात यावी म्हणून आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०४ ऑक्टोबर २०२५ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई स्मारक समिती पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने महाराष्ट्रातील मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र अनेक ठिकाणी अतिवृष्टी मुसळधार पावसामुळे शेतजमिनी वाहून गेल्या शेतीचे नुकसान झाले नागरिकांची घरे पाण्यात वाहून गेली जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडत असून पशुधन मुसळधार पावसामुळे वाहून गेले असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अतिवृष्टीतील ओला दुष्काळ लक्षात घेता मराठवाड्यातील पश्चिम महाराष्ट्रातील उर्वरित महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना मदत करण्यात यावी यासंदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांना समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यागमूर्ती माता रमाई समिती पिंपरी चिंचवड शहर निमंत्रक बाळासाहेब रोकडे, बापूसाहेब गायकवाड, दशरथ ठाणांबीर, संतोष जोगदंड, प्रकाश बुक्तर, तुकाराम गायकवाड, उत्तम कांबळे, बाबासाहेब वाघमारे, प्रमोद शेरे, ॲड. निलध्वज माने, संजय धुतरमल आदी मान्यवर उपस्थित होते.



