अभिवादनउत्सवदेश-विदेशपिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषशहरशुभेच्छासामाजिक

अशोका विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन ऐतिहासिक भीमसृष्टी पिंपरी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०४ ऑक्टोबर २०२५ बौद्ध समाज बांधव पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने गुरुवार दि. ०२/१०/२०२५ रोजी ऐतिहासिक भीमसृष्टी पिंपरी या ठिकाणी विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रथम सत्र : सकाळी १०:३० वा विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मा. अण्णासाहेब बोदडे उपायुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
मा. किरण गायकवाड विशेष अधिकारी, मा. प्रफुल पुराणिक जनसंपर्क अधिकारी व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. महायान मसुरे तात्या यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला.
व सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली, वरील मान्यवरांनी अशोका विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वकील संघटनेच्या वतीने ऐतिहासिक भीमसृष्टीमधील सर्व उपस्थितांना खीरदान करण्यात आले यावेळी ॲड. मिलिंद कांबळे, ॲड. सुनील माने, ॲड. सागर माने, ॲड. नीलध्वज माने उपस्थित होते.
द्वितीय सत्रामध्ये सायंकाळी ०६:३० वा व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी बुवासाहेब अहिवळे यांनी प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या धम्मक्रांती विषयी व त्यांनी निर्माण केलेल्या प्राचीन वारसाची माहिती सर्वांना समजावून सांगितली. भिमशाहीर पँथर दत्ता गायकवाड यांनी अशोका विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या, भीमसैनिक प्रकाश बुक्तर यांनीही अशोका विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
प्रमुख व्याख्याते मा. अण्णासाहेब बोदडे उपयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका विषय:
सर्वव्यापी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांनी दिलेला धम्म या विषयी सविस्तर माहिती दिली. त्या प्रसंगी बोलताना आण्णासाहेबनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचे नसुन संपूर्ण भारतीयांचे आहेत. सर्वांना मुलभूत अधिकार दिले आहेत. डॅा बाबासाहेबांनी महायान किंवा हिनयान पंथाचा बौध्द धम्म न देता त्यांनी मध्यम स्वरूपातील बौध्द धम्म दिला आहे. सर्व पंथातील योग्य व चांगले चांगले बौध्द विचार व संस्कार आपल्याला दिले आहेत.
डॅा बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशातील चरा चराला संरक्षण दिले आहे. प्राणी,पक्षी व सर्व मानवी कल्याणाची तरतूद करणारे संविधान हे बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले असल्याने ते सर्वव्यापी आहेत असे मत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे यांनी यावेळी व्यक्त केले.
तसेच अध्यक्षीय भाषणात महायान मसुरे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्व सांगितले. उपस्थित सर्व उपस्थितांनी या व्याख्यानास खूप चांगला प्रतिसाद दिला.
रात्री ०८:०० वा परिवर्तनवादी विचारांची गाणी स्वरांजली कला विकास प्रबोधन मंच पिंपरी चिंचवड शहर गायक गौतम कांबळे व संच यांच्या वतीने प्रबोधनात्मक गीतांचे सादरीकरण करण्यात आले व सर्व उपस्थितांनी या गीत गायनास भरभरून प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाची प्रस्तावना राम भंडारे यांनी केली व सूत्रसंचालन राजू भालेराव यांनी केले व कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार रवी कांबळे यांनी मांडले.
या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड शहरातील बौद्ध उपासक/ उपासिका व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बौद्ध समाज बांधव पिंपरी चिंचवड शहर या समूहातील मनोज गजभार, रवी कांबळे, महायन मसुरे, राजू साळवे, राम भंडारे इत्यादी सदस्यांनी विशेष प्रयत्न करून हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल त्या सर्व सदस्यांचे बौद्ध समाज बांधव पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने कौतुक व स्वागत करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!