सम्राट अशोका धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रबुद्ध मैत्री संघाच्यावतिने भीमसृष्टी पिंपरी येथे ०२ ऑक्टोबर रोजी धम्म रॅलीचे आयोजन संपन्न..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०४ ऑक्टोबर २०२५ प्रबुद्ध मैत्री संघ आदर्श नगर मोशी पुणे तर्फे सम्राट अशोका धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भीमसृष्टी, पिंपरी, पुणे येथे दि. ०२ ऑक्टोबर रोजी धम्म रॅली काढण्यात आली. संघा तर्फे डाॅ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला, धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मनोगत व्यक्त करून त्रिशरण, पंचशील ग्रहण करण्यात आले. तसेच या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या. मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी संघातर्फे आर्थिक मदत “सकाळ रिलीफ फंडास” देण्यात आली. तसेच संध्याकाळी अध्यक्ष नरेंद्र प्रगणे यांच्या निवासस्थानी भारतीय बौद्ध महासभेच्या बौद्धाचार्य रेखाताई ढेकळे यांचे सम्राट अशोका धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रवचन झाले. रॅलीमध्ये लहान मुले मुली, उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धम्म सेवक राजू चंद्रकांत कांबळे, अध्यक्ष नरेंद्र प्रगणे, सचिव साहेबराव गोपाळे, खजिनदार संतोष तायडे, मारुती तुरुकमारे, रमेश वाघमारे, चेतन पाखरे, सुभाष वाकळे गुरुजी, तसेच कोकिळाताई इंगोले, रिताताई तायडे, मायाताई प्रगणे यांनी विशेष परिश्रम घेतले.



