गून्हामहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

घरातील लॅपटॉप, मोबाईल चोरीकरणारी तामीळनाडु गँगचे एकुण २३ गुन्हे उघड १४,३०,०००/- रु.किं.चे ६० मोबाईल व १४ लॅपटॉप जप्त वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी.

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. २७ डिसेंबर २०२३ पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात सकाळचे वेळी लोकांचे घरांचे उघडे दरवाजावाटे घरात घुसुन घरातील लॅपटॉप व मोबाईल चोरीस जाण्याच्या व सकाळी मॉर्निंग वॉक करणारे महीलांचे गळयातील चैन स्नॅचिंगचे घटनांमध्ये मोठया प्रमाणावर वाढ झालेने मा. श्री. विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना पहाटेचे वेळी जास्तीत जास्त प्रमाणात गस्त घालुन
वेळोवेळी नाकाबंदी करुन संशयीत इसमांना ताब्यात घेवून गुन्हे उघड करणेबाबत आदेशीत केले होते.
वाकड पोलीस स्टेशन हद्दीत देखील सकाळचे वेळी घरात घुसुन लॅपटॉप/मोबाईल चोरीचे घटनांमध्ये मोठया प्रमाणावर वाढ होत असल्याने मा. पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे मा. श्री. गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस ठाणे यांनी तपास पथकातील सपोनि. संतोष पाटील व पोउपनि. सचिन चव्हाण यांना गुन्हे प्रकटीकरण विभागाचे जास्तीत जास्त अंमलदार हे पहाटेचे वेळी गस्तकरीता नेमुन नाकाबंदी करुन त्यांचे नेमलेले बातमीदारांचे मार्फत माहिती काढुन सदरचे गुन्हयांना आळा घालून गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिले.
दाखल गुन्हयांचे तपासात गुन्हे प्रकटीकरण पथकाने सिसीटीव्हीचे आधारे शोध घेत तीन वेगवेगळया वर्णनाचे आरोपी हे वाकड हद्दीत चो-या करुन काळेवाडी फाटा येथुनच ते रिक्षाने पिंपरीकडे जात असलेचे निदर्शनास आले.
त्यामुळे सपोनि.संतोष पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागातील अंमलदार यांचे वेगवेगळे ०४ पथके तयार करुन भुमकर चौक, डांगे चौक, काळेवाडी फाटा, जगताप डेअरी या ठिकाणी सापळा कारवाई करुन सिसीटीव्ही फुटेजमधील संशयीत इसम मिळुन आलेस त्यांना ताब्यात घेणेकरीता सांगीतले. आरोपी एक-दोन दिवस गॅप ठेवुन गुन्हा करण्यासाठी येत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सापळा कारवाई मध्ये सुरवातीला दोन दिवस कोणीही संशयीत मिळुन आले नाहीत. सापळा कारवाई सुरू ठेवत संशयीत इसमांचा शोध सुरु असताना काळेवाडी फाटा येथे एक इसम संशयीतरित्या चालत जाताना दिसला. त्याचा चेहरा सिसीटीव्ही मधील संशयीत इसमांसारखे दिसल्याने त्याला लागलीच ताब्यात घेवून झडती घेतली असता त्याचेकडे ०३ मोबाईल व ०२ लॅपटॉप मिळुन आले.
त्यामुळे शोध सुरु असणारे हेच आरोपी आहेत हे सिध्द झाले. आरोपीचे नाव सौंदराजन गोविंदन वय २१ वर्षे मुळ रा. नं. ७५, उदयराज पालयम, पो. थोट्टलाम, मादनुर ता. अंबुर जि.वेल्लोर राज्य- तामीळनाडु अशी होती.
त्याचेशी बोलतांना भाषेची अडचण निर्माण झाली, आरोपीला तामिळ भाषा सोडुन कोणतीही भाषा येत नव्हती.
वाकड पोलीस ठाणेकडिल पोशि. सतीश पिल्लामारी यांना सदर भाषा येत असल्याने त्यांना तपास टिम मध्ये घेण्यात आले. आरोपी तामिळनाडु राज्यातील ज्या भागातील आहे तेथे याच पध्दतीचे गुन्हा करणारे आरोपी राहतात,
तसेच सदर आरोपी गुन्हयातील मुद्देमाल परत करत नाहीत अशी माहिती प्राप्त झाली. आरोपी ज्या ठिकाणी राहतात तेथे आरोपी ठरवलेल्या वेळेत परत आले नाहीत तर त्यांचे कुंटबातील इतर सदस्य व साथीदार रुम सोडुन मुद्देमालासह पळुन जातात अशी माहिती प्राप्त झाली. ताब्यात असलेला आरोपी कोणतेही सहकार्य करत नव्हता तसेच राहण्याचा पत्ता सांगत नव्हता त्यामुळे तांत्रिक तपासाचा आधार घेत आरोपी भोसरी येथे राहण्यास असल्याचे निष्पन्न झाले. पंरतु तपास टिम भोसरी येथे पोहचण्यापुर्वी आरोपीचे साथीदार व कुंटबिय पळुन गेले होते. त्यांचे मोबाईल नंबरचा तांत्रिक तपास केला असता पळुन गेलेले आरोपी हे त्यांचे मुळ गांवी तामिळनाडु येथे जाण्यासाठी
बैंगलोर (कर्नाटक) येथे जाणार हे निष्पन्न केले. परंतु त्यानंतरही पुण्यातुन बैंगलोर जाण्यासाठी अनेक बस, ट्रॅव्हल्स, ट्रेन असल्याने तपासात अडचणी निर्माण झाल्या. परंतु तपास पथकाने आरापींचा कौशल्यपुर्ण तपास करित पळुन जात असलेले आरोपी हे एम.आर. ट्रॅव्हल्स ने जात असल्याचे निष्पन्न करित सदर ट्रव्हल्सचा पाठलाग करित खंबाटकी घाट सातारा येथे जावुन गाडी थांबवुन आरोपीं नामे १) गुनासेकर संकर वय २१ वर्षे २) तामीलारसन मादेश वय २१ वर्षे सर्व सध्या रा. चंद्रशेखर माणिकचंद जैन यांचे खोलीत, जैनशांती अदिनाथनगर, सुखवानीबाग, भोसरी पुणे मुळ रा. नं. ७५, उदयराज पालयम, पो. थोट्टलाम, मादनुर ता.अंबुर जि.वेल्लोर राज्य-तामीळनाडु ताब्यात घेतले. आरोपींचे कडे अनेक लॅपटॉप व मोबाईल मिळुन आले.
तिन्ही आरोपींना गुन्हयात अटक करून त्यांचेकडे तपास केला असता सदरचे आरोपी हे तामीळनाडु चोरी करणेचे उद्देशाने पिंपरी चिंचवड परीसरात येवून वेगवेगळ्या भागांमध्ये सकाळचे वेळी फिरुन उघडे घरात प्रवेश करुन घरातील मोबाईल लॅपटॉपची चोरी करुन, त्याची तामीळनाडु राज्यात जावुन विक्री करीत असलेबाबत समजले. आरोपींनी वाकड हद्दीत तसेच पिंपरी चिंचवड मधील वेगवेगळया ठिकाणी घरांमध्ये चो-या केलेचे कबुली दिली. त्यांचे राहते घरांची झडती घेतली असता त्यांचे घरामधून मोठया प्रमाणावर मोबाईल व
लॅपटॉप मिळून आले. आरोपी यांनी चोरलेले काही लॅपटॉप व मोबाईल फोन त्यांचे मुळ गांवी तामिळनाडु येथे पाठवल्याचे निष्पन्न झाल्याने मा.वरिष्ठांचे परवानगीने पोउपनि. सचिन चव्हाण व अंमलदार असे तामिळनाडु येथे जावुन कौशल्यपुर्ण तपास करित अनेक लॅपटॉप व मोबाईल फोन जप्त केले. आरोपींचेकडुन हस्तगत करण्यात आलेले मोबाईल व लॅपटॉप बाबत पिंपरी चिंचवड मधील विविध पोलीस स्टेशनला एकुण २३ गुन्हे दाखल असुन आरोपींकडुन एकुण ६० मोबाईल फोन व १४ लॅपटॉप सह रोख रक्कम असा एकुण १४,३०,०००/- रुपयांचा माल जप्त करणेत आला आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीमध्ये आहेत.
सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. संजय शिंदे सह पोलीस आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. डॉ. काकासाहेब डोळे पोलीस उप आयुक्त परि-२ पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. विशाल हिरे सहा. पोलीस आयुक्त वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. गणेश जवादवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा.श्री. विठ्ठल साळुंखे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि. संतोष पाटील, पोउपनि. सचिन चव्हाण, सपोफौ. बिभीषण कन्हेरकर, सपोफौ. बाबाजान इनामदार, सपोफौ. राजेंद्र काळे, पोहवा. संदीप गवारी, पोहवा. वंदु गिरे, पोहवा. स्वप्निल खेतले, पोहवा. दिपक साबळे, पोहवा. अतिश जाधव, पोहवा. प्रमोद कदम, पोहवा. विक्रांत चव्हाण, पोहवा. अतिक शेख, पोना. प्रशांत गिलबीले, पोशि. अजय फल्ले, पोशि. भास्कर भारती, पोशि. स्वप्निल लोखंडे, पोशि. कौंतेय पोशि
रमेश खेडकर, पोशि. सतीश पिल्लामारी, पोशि. सागर पंडीत (परि-०२ कार्यालय) यांनी मिळुन केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!