शहरसामाजिक

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य भीम जयंती महोत्सव निगडी पिंपरी चिंचवड येथे उत्साहात साजरा.

प्रतिनिधी-निगडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत या ठिकाणी अनोखा उपक्रम राबवून नऊ मंडळ मिळून एकत्र भीम जयंती साजरी करण्याचा नव्याने उपक्रम निगडी येथे राबविण्यात आला या कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आला.
भीम जयंतीचे नियोजन करण्यात आले प्रत्येक मंडळाने जवाबदारी स्विकारून अतिशय उत्साहात निगडी येथे भीम जयंती सोहळा पार पडला यावेळी सावित्रीबाई फुले बुद्ध विहार आयोजित व रोशन युवा प्रतिष्ठान, वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहर यांच्यावतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली या सोहळ्याला उपस्थित राज्य उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी सर्वजीत बनसोडे तसेच वंचित बहुजन युवक आघाडी राज्य सदस्य ऋषिकेश नांगरे पाटील पिंपरी चिंचवड शहर महासचिव संजीवन कांबळे, शहर सचिव राजू साळवे, शहर उपाध्यक्ष दीपक भालेराव, आर के जानराव, सुधीर लोंढे, शारदाताई बनसोडे, शिरीष भालेराव, तसेच काही सामाजिक कार्यकर्ते या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित राहून सर्वांनी शुभेच्छा दिल्या या मंडळांना एकत्र करण्यासाठी वंचित बहुजन युवक आघाडी उपाध्यक्ष राहुल बनसोडे तसेच निगडी विभाग अध्यक्ष प्रशांत नाटेकर यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम व्यवस्थित येथे पार पडला या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले बुद्ध विहार अध्यक्ष अमर साळवे गुरुजी तसेच कोषाध्यक्ष विजय साळवे, सुरज खरात, सुरज कांबळे, अक्षय नंदनवरे, सुरज जावळे, आनंद कांबळे, कुणाल गायकवाड, बरमा साळवे, करण खरात, संदीप खरात, अतुल साळवे, आकाश मांजरे, सुमित मस्के, व आदी पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!