
प्रतिनिधी-महाळुंगे एमआयडीसी हद्दीमध्ये वेअर हाऊसमध्ये चोरी करणा-या सराईत दोन गुन्हेगारांना अटक त्यांचेकडुन ५,४९,२७८/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन दिनांक : २१/०४/२०२२ महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. १८५/२०२३ भा.द.वि.क. ४६१,३८० मधील फिर्यादी नामे कल्पेश रणजितसिंह वेद, वय-५३ वर्षे, धंदा-नोकरी, रा. ब ३०२ कल्पतरु स्पंडर वाकड, पुणे यांनी फिर्यादी दिली की, दिनांक ०६/०४/२०२३ रोजी पाहटे ०२.०० वा ते सकाळी १०.३० वाजताचे दरम्यान मौजे कुरूळी गावाचे हद्दीत, असलेल्या आर वी सी सप्लाय चेन सोल्यूशन प्रा. लि. कंपनीमध्ये कुरूळी, ता. खेड जि. पुणे येथील कंपनीमधील वेअर हाऊसचे पाठीमागील बाजूचे पत्र्याचे शेड उचकटून आतमध्ये प्रवेश करुन कोणी तरी अज्ञात चोरटयाने मुद्दाम लबाडीचे इरादयाने स्वतःच्या फायदया करीता ५,१९,२७८/- किंमतीचे फोर्थ, फिफ्थ, सिक्स सिंक्रो नायझर रिंग, डेल व एच पी कंपनीचा लॅपटॉप, ५० इंची लॉईड कंपनीचा एल ई डी टिव्ही चोरुन घेऊन गेला आहे. म्हणून फिर्यादीने अज्ञात चोरटया विरुध्द कादेशीर तक्रार दिल्याने वरीलप्रमाणे गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्हा हा चोरीचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असुन सदरबाबत मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक, महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन यांनी तांत्रीक विश्लेषणाव्दारे व गुप्त बातमीदारा मार्फत अज्ञात आरोपीचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत तपास पथकास आदेशित केले होते.
सदर दाखल गुन्हयाचे तपासात दिनांक १७/०४/२०२२ रोजी गुप्त बातमीदारा मार्फत व तांत्रिक विश्लेषणाव्दारे माहिती प्राप्त झाली की, महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. १८५/२०२३ भा.द.वि.क. ४६१,३८० मधील चोरीस गेलेला माल
१) आलम युसूफ मणियार, वय-३२ वर्षे, धंदा- भंगार व्यवसाय, रा. कुदळवाडी, ता.
हवेली, जि. पुणे, मुळगाव-जमनापूर, ता. उचाहार, जि. रायबरेली, उत्तर प्रदेश
२) गणेश रामबाबू निशाद, वय-२२
वर्षे, भंगार व्यवसाय, रा. गवळी माथा झोपडपट्टी, बँकेच्या मागे, भोसरी टेल्को रोड, जि. पुणे, मुळगाव-विष्णुपुरा जनहा गोरखपुर, उत्तरप्रदेश यांनी केल्याची माहिती प्राप्त झाल्याने त्यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता सदर गुन्हा त्यांनी केल्याचे कबुल केल्याने सदर आरोपीची पोलीस कस्टडी घेवुन सदर गुन्हयात चोरीस गेलेला
५,४९,२७८/- किंमतीचे फोर्थ, फिफ्थ, सिक्स सिंक्रो नायझर रिंग, डेल व एच पी कंपनीचा लॅपटॉप, ५० इंची लॉईड कंपनीचा एल ई डी टिव्ही व मोटार सायकल जप्त करण्यात आले आहेत. गु.र.नं. व कलम एकुण जप्त माल १८५/२०२३भा.द.वि.क. ४६१,३८०,३४ किंमत
फोर्थ, फिफ्थ, सिक्स सिंक्रो नायझर रिंग, डेल व ५,४९,२७८/- एच पी कंपनीचा लॅपटॉप, ५० इंची लॉईड रुपये किंमतीचे कंपनीचा एल ई डी टिव्ही व मोटार सायकल नं. एम एच ०३ डी एफ ९६८१ यांना दाखल गुन्हयामध्ये दिनांक १७/०४/२०२३ रोजी २२/४४ वाजता अटक करण्यात आली आहे. यातील आरोपी नामें आलम युसूफ मणियार, वय-३२ वर्षे, धंदा- भंगार व्यवसाय, रा. कुदळवाडी, ता. हवेली, जि. पुणे, मुळगाव-
जमनापूर, ता. उचाहार, जि. रायबरेली, उत्तर प्रदेश यावर यापुर्वी एकुण दाखल गुन्हे
अ.नं.
पोलीस ठाणे गु.र. नंबर व कलम
१) पिंपरी- १५२/२०१४ भादवि कलम ४५४,४५७,३८०
२) पिंपरी ३८२/२०१४ भादवि कलम ४५४,४५७,३८०,५११
३) पिंपरी ३३०/२०१५भादवि कलम ४५४,४५७,३८०
४) पिंपरी ३९४/२०१५भादवि कलम ४५४,४५७,३८०
५) पिंपरी ३९२/२०१६भादवि कलम ३९९,४०२, आर्म ॲक्ट ४ (२५),
६) भोसरी १३/२०१३ भादवि कलम ४३९,३९९,४०२
७) पौड ५५८/२०२२ भादवि कलम ३७९
८) महाळुंगे १८५/२०२३ भादवि कलम ४६१,३८०
९) चाकण १०८० / २०२२ भादवि कलम ४६१,३८०,३४
१०) चाकण १७३३ / २०२२ भादवि कलम ४५७,३८०,३४
११) चाकण १७४३ / २०२२ भादवि कलम ४६१,३८०,३४
याद्वारे सर्वांना आवाहन करण्यात येते की, कंपनी परिसरामध्ये सिक्युरिटी गार्ड नेमावेत तसेच सी सी टि व्हि कॅमेरे व लाईट लावाव्यात तसेच कंपनी परिसरामध्ये संशयित इसम फिरताना मिळुन आल्यास पोलीसांशी संपर्क साधावा त्यामुळे कंपनीमधील चोरीस प्रतिबंध निर्माण होईल. सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे, मा. सह पोलीस आयुक्त श्री. मनोज लोहिया, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. संजय शिंदे, मा. पोलीस उप-आयुक्त श्री विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रेरणा कट्टे यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. वसंत बाबर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. किशोर पाटील, पोलीस उप निरीक्षक विलास गोसावी, सपोफौ थेऊरकर पोहवा राजू कोणकेरी, अमोल बोराटे, युवराज बिराजदार, संतोष होळकर पोना संतोष काळे, किशोर सांगळे, विठ्ठल वडेकर, मपोना जमदाडे, पोकॉ/ शिवाजी लोखंडे, बाळकृष्ण पाटोळे, शरद खैरे, राजेंद्र खेडकर, संतोष वायकर, गणेश गायकवाड यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक विलास गोसावी, महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.



