SRA वर विश्वास नाही त्यांच्या माध्यमातून राबली जानारी आवास योजना नको- विनोद क्षीरसागर

प्रतिनिधी- SRA ही संस्था विश्वासपात्र नाही म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्यांच्या कार्यक्षेत्रातील आनंदनगर, चिंचवड या झोपडपट्टी येथे रमाई आवास योजना (शहरी) राबवण्यात यावी. RTI मानवी हक्क कार्यकर्ते फेडरेशन ऑफ महाराष्ट्रचे श्री. विनोद क्षीरसागर यांनी मूख्यमंत्री कार्यालयास समक्ष भेटून पत्र दिले. या वेळी ते बोलले की वरील विषयास अनुसरून पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील आनंद
नगर, चिंचवड, या झोपडपट्टी मध्ये माता रमाई आवास योजना (शहरी) राबवून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील कुटुंबाचे राहनीमान उंचावून त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सदर ठिकाणातील रहात असलेल्या गरजू लाभार्थ्यांना स्वतःच्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या ठिकाणी पक्के घर हे रमाई आवास योजनेतून बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून निधी वितरित करण्याबाबत आपल्या मार्फत सदर योजने संबंधित विभाग अथवा कार्यालयांना सूचना तसेच आदेश देण्यात यावेत अशी विनंती मूख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना पत्रा द्वारे केली. साहेब या बाबतीत योग्य ती कारवाई करती अशी अपेक्षा व्यक्त करतो. असे त्यांनी आमच्या प्रतिनिधीस सांगीतले.




