राकेश किशोर तिवारी ने मनूवादी विचारातून केलेल्या कृत्याच्या विरोधात भीमशक्ती संघटनेचे पिंपरीत तीव्र निषेध आंदोलन..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी भीमशक्ती संघटना पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पिंपरी येथे भारताचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई साहेब यांच्यावर झालेल्या बूटफेकीच्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.
या आंदोलनाचे नेतृत्व भीमशक्ती संघटनेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुरजभाऊ गायकवाड तसेच पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रतापसिंह खैरारिया यांनी केले.
या प्रसंगी प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये भीमशक्ती पुणे शहराध्यक्ष विजय हिंगे, भीमशक्ती शहर प्रभारी अक्षय कसबे, युवती महिला अध्यक्ष प्रतिभा बनसोडे, प्रा. युवराज भास्कर, प्रा. बी. बी. शिंदे, काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, काँग्रेस नेते व माजी शिक्षण मंडळ सभापती अभिमन्यू दहीतुळे, हरीश डोळस, जेष्ठ नेते राजन नायर, जेष्ठ कवी गोविंद गाडे, अजय शेरखाने, महेश कांबळे, वाल्मिकी समाज महाराष्ट्र प्रदेश महासचिव सुनील चटोले, मल्हार आर्मी नेते राहुल मदने, मुस्लिम समाजाचे युवा नेते शोएब मुजावर, भिमशाही संघटनेचे शिवशंकर उबाळे, विजय ओव्हाळ, विजय केदारी, लक्ष्मण साळुंखे, सुनील कांबळे, नवनाथ मस्के, किशन तिगोटे, अशोक उघडे, राजू कांबळे, तात्या सूर्यवंशी, अंकुश देडे, मुकेश गायकवाड, अशोक गायकवाड, देविदास साळवे, श्रीरंग चंदनशिवे, रामभाऊ पवार, सिद्धार्थ बनसोडे, रावसाहेब कांबळे, संजय पाटील, दिलीप कांबळे, तसेच महिला नेते सविता खैरारिया, अंजली साळवे, सपना कुडीया, वैशाली आठवले, वंदना गायकवाड, फरीन शेख, संतोष बनसोडे, सुरेखा गोळे, जया कांबळे, मंगला पाटोळे, बालिका मस्के, करिष्मा खैरारिया आदींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या आंदोलनात भीमशक्ती संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शहरातील अनेक भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनातून एकच घोष उमटला — “न्यायव्यवस्थेचा अपमान सहन होणार नाही!”
“भीमशक्ती जिंदाबाद!”



