आंदोलनमहाराष्ट्रमूंबईराजकीयविशेषशहरसामाजिक

ठाण्यातील विविध समस्यांसाठी विरोधी पक्षाचा पालिकेवर मोर्चा..

ठाण्यात विरोधी पक्षाचा मोर्चा!..
ठाण्यातच नाहीतर महाराष्ट्रात चर्चा!..

प्रतिनीधी सतिश पाटील मुंबई दि. १४ ऑक्टोबर २०२५ ठाणे महानगरपालिकेतिल सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे शहरातील विविध समस्यांचा व भ्रष्टाचाराचा पाढा वाचला आणि ठाणेकरांना भेडसावत असलेल्या वाहतूक कोंडी, घन कचरा, पाणी इ. विविध समस्यांबाबत जाब विचारला.
शिवसेना (उबाठा) आणि मनसेने सोमवारी पालिका मुख्यालयावर काढलेल्या मोर्च्यात राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षही सहभागी झाला होता.
तसेच पालिकेत अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या पदोन्नतीची श्वेतपत्रिका काढा, अशी आग्रही मागणी शिष्ट मंडळाने केली. तसेच लाचप्रकरणात अटक असलेले उपायुक्त शंकर पाटोळे आणि अनधिकृत बांधकाम प्रकरणावरूनही टीकेची झोड उठवत आयुक्तांना धारेवर धरले.
ठाण्यातील गडकरी रंगायतन ते ठाणे महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा निघाला होता. शिवसेना (उबाठा) नेते भास्कर जाधव, राजन विचारे, खासदार: संजय दि.पाटील, विभाग प्रमुख: रमेश कोरगावकर, सुरेश पाटील युवासेना कार्यकारिणी सदस्या : कु.राजोल ताई पाटील , माजी नगरसेवक: संजय तरे, रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार: बबन पाटील, पत्रकार: सतिश पाटील,
जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहर प्रमुख-अनिष गाढवेसंह सर्व पदाधिकारी मनसे नेते अभिजीत पानसे, अविनाश जाधव, शहर प्रमुख रवींद्र मोरे, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, तमाम शिवसैनिक, महाराष्ट्र सैनिक (महिला-पुरूष) व ठाणेकर हेही मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा महापालिका मुख्यालयाजवळ येताच, या सर्व नेत्यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!