प्रबुद्ध मैत्री संघाचा वर्षावास समाप्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न…

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १७ ऑक्टोबर २०२५ साधारण तिन दिवसांन पूर्वी म्हणजे दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रबुद्ध मैत्री संघ आदर्श नगर ,मोशी पुणे, येथे मोठ्या दिमाखात पूज्य भदंत बुद्धघोष मेताथेरो तसेच प्रबुद्ध मैत्री संघातील शेकडो उपासक उपासिका मुले मुले आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वर्षावास समाप्ती सोहळा पार पाडला… संध्याकाळी गंधर्व नगरी गेट पासून धम्म रॅली आदर्श नगर पर्यंत काढण्यात आली. रॅली मधे पंचशील व निळे ध्वज हातात घेऊन महापुरुषांच्या नावाने घोषणा देण्यात आल्या. रॅली मधे उत्साह, जोश होता. स्त्रियांनी निळ्या/ सफेद रंगाच्या साड्या व पुरुषांनी पंचशील टी-शर्ट परिधान केले होते. वातावरण सगळीकडे पंचशील व धम्ममय झाले होते. सोहळ्याच्या मंडपामध्ये पूज्य भदंत बुद्धघोष मेताथेरो यांचे फुलांचा वर्षाव करून उपासक उपासिका कडून स्वागत करण्यात आले. पूज्य भदंत यांना याचना करून बुद्ध वंदना व त्रिशरण पंचशील गृहण करण्यात आले. यानंतर मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. रीताताई तायडे व कोकिळाताई इंगोले यांनी प्रबुद्ध मैत्री संघाविषयी केलेल्या कार्याचा व वर्षावासातील धम्मवर्ग व समाप्ती विषयी मनोगत व्यक्त केले. कुमारी कोमल पुंडकर हिने अत्यंत नियोजन पद्धतीने सूत्रसंचालन केले. तसेच धम्म बंधू संतोष तायडे यांनी आभार प्रदर्शन व मान्यवरांचे स्वागत केले. शेवटी पूज्य भदंत बुद्धघोष मेताथेरो यांची सुंदर धम्मदेशना झाली. तसेच त्यांच्याकडून ह्या वर्षावास मध्ये आपल्या घरी धम्म वर्ग घेतलेल्या उपासक उपासिकांचा सत्कार करण्यात आला वर्षावास सोहळ्यासाठी धम्मदान व वस्तुरूपी दान सभासदाकडून करण्यात आले. शेवटी सर्वांना भोजनदानाचा कार्यक्रम होऊन वर्षावास समाप्ती सोहळ्याची यशस्वी सांगता झाली. वर्षावास काळात बौद्ध लेणी अस्मिता आंदोलन आझाद मैदान मुंबई, तसेच बोधगया मुक्ति आंदोलन/बौद्ध समाज विकास विहार संघटन आचार्य अत्रे सभागृह कार्यक्रमास पिंपरी येथे प्रबुद्ध मैत्री संघाने उपस्थिती दाखविली. कोंढाणे बौद्ध लेणी कर्जत येथे धम्म सहल काढण्यात आली, बौद्ध बेडसे लेणी मोनेस्ट्रीमध्ये कठीण चिवरदान सोहळ्यास उपस्थिती व मराठवाडा पूरग्रस्तांना आपली सामाजिक बांधिलकी म्हणून संघातर्फे आर्थिक मदत सकाळ रिलीफ फंडा कडे देण्यात आली ह्या वर्षावास कार्यक्रमासाठी आदरणीय भंते धम्मानंदजी, आदरणीय सुभाष वाकळे गुरुजी तसेच प्रबुद्ध मैत्री संघाचे अध्यक्ष , नरेंद्र प्रगणे, सचिव साहेबराव गोपाळे, खजिनदार संतोष तायडे व उपाध्यक्ष रमेश वाघमारे, कार्याध्यक्ष मारुती तुरुकमारे, रामचंद्र मोटेसाहेब, विनोद मोरे जयदेव पुंडकर, सुबोध कांबळे, चंद्रकांत चिकटे अर्जुन गव्हाळे, रमेश केदारी, क्षितिज तायडे, अशोक तूप सौंदर, चेतन पाखरे, सुनील खिल्लारे, मयूर पुंडकर, कोकणे, भीमचंद्र झडते, सुभाष शिंदे, गजानन वारुळे/शेगोकार, ॲड. प्रताप जाधव, बाबाराव व चतुर्थी/सोनाली पुंडकर, मनीषा मोरे, अर्चना कांबळे, मायाताई प्रगणे, लीलाताई पाखरे, शोभाताई तुरुकमारे, रजनीताई लव्हाळे, दीपाताई गोपाळे यांचे सहकार्य लाभले (वर्षावासात बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन करताना आदरणीय सुभाष वाकळे गुरुजी व त्यांना सुरेख साथ कोमल पुंडकर, स्नेहल मोरे, पूनम केदारी यांनी दिली. वर्षावास धम्म वर्गात विशेष उपस्थिती आजी शांताबाई पवार (जुन्या काळातील भीमगीत गायिका ) व मीराआजी पुंडकर आवर्जून उपस्थित होत्या वर्षावास धम्मवर्गात ज्या मान्यवरांनी आपला अमूल्य वेळ देऊन प्रवचन दिले, भारतीय बौद्ध महासभा, मावळ लेणी संवर्धक टीम, लेणी संवर्धक विकास धनवे, त्रिरत्न बुद्ध विहार नायगाव मावळ सर्वांचे मनःपूर्वक आभार सर्व कमिटी मेंबर तसेच, सर्व प्रबुद्ध मैत्री संघाच्या सभासदांनी मोठे परिश्रम घेतले. समन्वयकाची भूमिका धम्म सेवक राजू चंद्रकांत कांबळे यांनी पार पाडली.



