कोतवालवाडी चर्होली येथे तथागत वेल्फेअर फाऊंडेशनच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन हर्षउल्हासात संपन्न..

प्रतिनिधी पूणे दि. १९ ऑक्टोबर २०२५ साधारण चार दिवसांन पूर्वी धम्मचक्र प्रवर्तन दिन दि. १४ ऑक्टोंबर २०२५ मंगळवार रोजी कोतवाल वाडी चर्होली बु. पुणे येथे तथागत वेल्फेअर फाऊंडेशनच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सौ. गौरीताई शेलार जिल्हा महिला अध्यक्षा रिपब्लिकन सेना दिघी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघ साहेब सामाजिक कार्यकर्ते महेश तापकीर जेष्ठ आंबेडकरी विचारवंत एस. एल. वानखेडे.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवव्याख्याते प्रा. संपतराव गारगोटेसर यांनी अनुयायांना धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सखोल असे मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम तथागत वेल्फेअर फाऊंडेशन सप्तगड गृहनिर्माण सोसायटी कोतवाल वाडी चर्होली बु यांनी आयोजित केला होता यावेळी तथागत वेल्फेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष रंगनाथ वाघमारे, सचिव राजु इंगळे, खजिनदार सदानंद उदागे, प्रविण सोनवणे, अशोक गायकवाड, राजेश आखाडे, सनि गवई, समाधान ओव्हाळ, सोमनाथ कांबळे, धनराज मनोहर, राजेंद्र गोडंगे, अरविंद केदारी, सचिन कांबळे, राजेंद्र ढगे, अजित कांबळे, जिवन वगरे प्रभाकर सुर्यवंशी तसेच सप्तगड गृहनिर्माण सोसायटीतील सर्व उपासक उपस्थित होते .
धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आयोजक तथागत वेल्फेअर फाऊंडेशन सप्तगड गृहनिर्माण सोसायटी चर्होली बु. पूणे कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रंगनाथ वाघमारे यांनी तर आभार प्रदर्शन सनी गवई यांनी केले.









