आंदोलनपिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

अवैध गौण खनिज उत्खनन मधील २००० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी खासदार अमोल कोल्हे यांनी घातले लक्ष

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ३१ ऑक्टोबर २०२५ गेले पाच दिवस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ जगताप हे अवैध गौण खनिज उत्खनन याच्या विरोधात आमरण उपोषण करत आहेत.
आज शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी उपोषण स्थळी भेट दिली.
एकीकडे सरकारकडे कंत्राटदार आणि लाडक्या बहिणींचे पैसे द्यायला पैसे नाहीत आणि दुसरीकडे अवैध गौण खनिज उत्खननामध्ये दोन हजार कोटींचा भ्रष्टाचार होतो याकडे सरकार जाणिवपूर्वक कानाडोळा करत आहे.
मी कलेक्टर यांच्याशी तीन तारखेला प्रत्यक्ष भेटून हा विषय मार्गी लावून दोषींवरती कारवाई करण्यासाठी सरकारला भाग पाडू असे अमोल कोल्हे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष काशिनाथ जगताप यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तीन तारखेला योग्य मार्ग नाही निघाला तर यापेक्षाही मोठे आंदोलन उभे करू असे खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितले.
यावेळी काशिनाथ जगताप यांना खासदारांनी ज्यूस पाजून हे उपोषण चार तारखेपर्यंत स्थगित राहील असे सांगितले.
यावेळी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष तुषार कामठे, महिला अध्यक्षा ज्योती निंबाळकर, प्रदेश संघटक संदीप चव्हाण, प्रदेश संघटक विक्रांत पाटील, उपाध्यक्ष अनिल भोसले, उपाध्यक्ष विनोद धुमाळ, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, गणेश भांडवलकर, रुपाली भडाळे नितीन मोरे, संतोष माळी, योगेश सोनवणे, तुषार गाडे, ॲड. दिलीप शिंगोटे, ॲड. रवींद्रकुमार भडाळे, लोभस साखरे, साळवे सर आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!