गून्हापिंपरी-चिंचवडपोलिसमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

लांडेवाडी महिंद्रा शोरूम समोर कामत कॉम्प्लेक्स येथे मोठा दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०१ नोव्हेंबर २०२५ लांडेवाडी महिंद्रा शोरूम समोर कामत कॉम्प्लेक्स येथे ४ ते ५ लोकांकडून मोठा दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला.
लांडेवाडी महिंद्रा शोरूम समोर कामत कॉम्प्लेक्स येथील टी. ए. खान यांच्या मालकीचे बॉम्बे टूल्स ट्रेनिंग कंपनीचे शटर उचकटून दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला परंतु फक्त शटर उचकटवण्यात आला आहे. या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बंद असून सोसायटीला रात्रपाळीला दोन व दिवसपाळीला दोन सूरक्षा रक्षक असून देखिल दुर्लक्ष झाले आहे. भोसरी निगडी हा दळनवळनाचा मूख्य रस्ता असून सुद्धा या ठिकाणी मोठ्या दरोड्याचा प्रयत्न झाला. पण मग सर्वसाधारण रस्ते ज्या ठिकाणी रहदारी नाही किवां कमी आहे अशा ठिकाणी काय अवस्था असेल असा वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे पुणें जिल्हा सचिव सालार भाई शेख यांनी खेद व्यक्त केला. पूढे ते म्हणाले की हा मूख्य रस्त्यावरील मूख्य चौक आहे या चौकातून एमआयडीसी मध्ये सुद्धा रोड जातो, तसेच वाय सी एम ला देखिल हा रोड जातो तरी सुद्धा या ठिकाणी असा प्रकार घडतो हे अश्चर्यच आहे. सूरक्षा रक्षक असून देखिल, काही ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे चालू आहेत. म्हणजे चोरांना भीती नाही गून्हेगारी दिसोंनदिवस वाढतच चालली आहेत या मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने नोकऱ्या न दिल्याने वाढत चाललेली बेरोजगारी मूळे होणाऱ्या चोऱ्या, दरोडे, लुटमार, खून, असे बरेच प्रकार दिवसेंदिवस वाढतच चाललेले दिसत आहेत. पोलीस प्रशासन कमी पडते की काय किंवा पोलिसांची भितीच या गून्हेगारांना राहीलेली दिसत नाही. घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून ११२ या नंबर वर फोन करून कळवण्यात आले, त्यानंतर एम. आई. डी. सी. पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी निलेश तळेकर यांनी पाहणी करून गेले आहे. पुढील तपास भोसरी एम. आई. डी. सी. पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!