महाराष्ट्रमूंबईविशेषशहरसामाजिक

डोंबिवलीत बेसिस्त वाहन चालकावर होणार कारवाई वाहतूकीत मोठे बदल..

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई
दि. १४ मे २०२६ डोंबिवलीतील वाढत्या वाहतूक कोंडीवर आता मोठे निर्णय घेण्यात आले असून रिक्षा स्टँड, वन-वे आणि ट्रॅफिक नियोजनात महत्त्वाचे बदल होणार आहेत.
डोंबिवली वाहतूक विभाग कार्यालयात भाजप नगरसेवक मंदार हळबे यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला वाहतूक विभागाचे अधिकारी राम पाटील, रिक्षा युनियन प्रतिनिधी काळू कोमासकर, दत्ता मळेकर तसेच रस्ता कामांचे कॉन्ट्रॅक्टर्स उपस्थित होते.
बैठकीत टंडन रोड, केळकर रोड, चिपळूणकर पथ, मानपाडा चौक, बिर्याणी कॉर्नर आणि बाजी प्रभू चौक परिसरातील वाहतूक समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. रिक्षा स्टँड, अनधिकृत थांबे, रस्त्यावर प्रवासी उतरविणाऱ्या रिक्षा आणि घिरट्या घालणाऱ्या वाहनांमुळे होणाऱ्या कोंडीवर उपाययोजना ठरवण्यात आल्या.
पाटकर रोड येथे अधिकृत रिक्षा स्टँड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून चिमणी गल्लीमार्गे वाहतूक वळविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच टंडन रोड ते शिवमंदिर रोड वन-वे करण्याचा प्रस्ताव, केळकर रोडवरील नवीन वाहतूक मार्गव्यवस्था लागू करण्यावर भर देण्यात आला.
यासोबतच अनधिकृत रिक्षा स्टँड हटविणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करणे आणि लाईनची शिस्त न पाळणाऱ्यांवर कठोर पावले उचलण्याची मागणी करण्यात आली. पुढील आठवड्यात नोटिफिकेशन काढून हे नियोजन एक महिना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार असून यशस्वी झाल्यास कायमस्वरूपी अंमलबजावणी केली जाणार आहे.
प्रत्येक वाहन चालकाने नियम, शिस्त, धीर घेऊन प्रवास केला तर दंड कारवाईला सामोरे जाव लागणार नाही! आणि “अति घाई संकटात नेई ” मला लवकर जायच म्हणून चूकीच्या दिशेने वाहन टाकून ना स्वतः जाऊ शकत ना समोरचा येवू शकत आणि येथेच सर्व खोळंबा होतो. याच साठी संयम खूप महत्वाचे असते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!